Download App

Pankhuri Awasthy: लग्नाच्या 5 वर्षानंतर पंखुडी-गौतमच्या घरी चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन!

  • Written By: Last Updated:

Gautam Rode Pankhuri Awasthy Twins Baby: मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय जोडी अभिनेता गौतम रोडे (Gautam Rode) आणि पंखुडी अवस्थी (Pankhuri Awasthy) आई-बाबा झाले आहेत. त्यांच्या घरी दोन चिमुकल्या पाहुण्यांचे आगमन झाले आहे. (Twins Baby) पंखुडीने एक मुलगा आणि एक मुलगी अशा जुळ्यांना जन्म दिला आहे. या जोडीने ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर त्यांनी यावेळी दिली आहे. २५ जुलै म्हणजेच आज तिने जुळ्या पाहुण्याना जन्म दिला आहे.


सोशल मीडियावर (Social media) ही आनंदाची बातमी शेअर करत त्यांनी शुभेच्छांसाठी चाहत्यांचे आभार मसाल्याचे दिसून येत आहे. दोघांनी देखील गेल्या काही महिन्यापासून त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक अॅनिमेटेड व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आपण आई-बाबा होणार असल्याचे चाहत्यांना सांगितले होते. या दोघांनी आनंदाची बातमी शेअर केल्यावर दिव्यांका त्रिपाठी, भारती सिंह, देवोलिना, आमिर अली आदींनी त्यांचे अभिनंदन केल्याचे दिसून येत आहे.

पंखुडी आणि गौतम यांची भेट ‘सूर्यपुत्र कर्ण’ या शोच्या दरम्यान झाली होती. या सीरियलमध्ये पंखुडीने द्रौपदीची भूमिका केली होती. तर, गौतमने कर्णाची भूमिका केल्याचे पाहायला मिळाले आहे. या सिरीयलच्या सेटवर झालेली मैत्री ही नंतर प्रेमात बदल्याची पाहायला मिळालं. त्यांच्या डेटिंगच्या अफवा पसरत असतानाच, अनेकांनी त्यांच्या वयाविषयी चर्चा रंगल्याचे पाहायला मिळालं होत. गौतम रोडे हा पंखुडीपेक्षा जवळपास १४ वर्षांनी मोठा आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

या जोडप्याने २०१८मध्ये राजस्थानमध्ये लग्न केल्याचे पाहायला मिळालं आहे. आता लग्नाच्या ५ वर्षांनंतर ते आई- बाबा झाले आहेत. अभिनेत्री पंखुडी अवस्थी हिने ‘सूर्यपुत्र कर्ण’, ‘कौन है?’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’, ‘मॅडम सर’, ‘आमला’ अशा अनेक सिरीयलमध्ये काम केल्याचे बघायला मिळाले आहे. तर, ‘शुभ मंगल ‍‍ज्यादा सावधान’ या बॉलिवूड सिनेमातही ती दिसून आली आहे.

Tags

follow us