Gautami Patil: ‘घुंगरू’ नंतर ‘या’ सिनेमात दिसणार गौतमी पाटील? म्हणाली…

Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. घुंगरू या आगामी सिनेमात मुख्य भुमिकेत गौतमी पाटील काम करणार आहे.   View […]

Gautami Patil

Gautami Patil

Gautami Patil: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil) तसेच लावणी क्वीन ही कायमच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहते. कधी टीव्हीवर तर कधी सोशल मीडियावर (Social media) तीच्या प्रत्येक गोष्टीची काहींना काही चर्चा सुरूच असते. गौतमी सिनेमात एन्ट्री करणार असल्याची चांगलीच चर्चा रंगली होती. घुंगरू या आगामी सिनेमात मुख्य भुमिकेत गौतमी पाटील काम करणार आहे.


तसेच लावणी क्वीन गौतमी ही आता अभिनय क्षेत्रात झळकणार हे ऐकताच तिच्या चाहत्यांनी तिला मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्याचे बघायला मिळाले होते. सोशल मीडियावर गौतमीचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत. लोककलावंताच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे. बाबा गायकवाड यांनी हा सिनेमा दिगदर्शित केला आहे. या सिनेमात गौतमी पाटीलची प्रमुख भूमिका आहे. हा सिनेमा कलावंतांच्या जीवनावर आधारीत असला तरी त्यात गौतमी पाटीलची लव्ह स्टोरीही दाखवण्यात आली आहे.

गौतमीचा हा पहिलाच चित्रपट असल्याने तिच्यासह तिच्या चाहत्यांना त्याची उत्सुकता लागली आहे. तिने एका मुलाखती दरम्यान मेन स्ट्रीम सिनेमांच्या ऑफर येत आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलत असताना गौतमीने सांगितले आहे की, ‘हो येत आहेत. सध्या दोन तीन सिनेमाच्या ऑफर आल्या आहेत. परंतु मी त्याबद्दल आता जास्त सांगू शकत नाही. लवकरच तुम्ही बघणार आहात.’ असं उत्तर दिलं आहे. आता गौतमीच्या या उत्तरामुळे येत्या काळात नक्की कोणत्या सिनेमात दिसणार याबद्दलची उत्सुकता चाहत्यांच्या मनात सध्या बघायला मिळत आहे.

Parineeti Raghav Wedding : चूडा सेरेमनीपासून फेऱ्यापर्यंत असा असणार राघव-परिणीतीचा विवाहसोहळा

गौतमी ही तिच्या अश्लिल कृत्यामुळे चांगलीच चर्चेत राहिली आहे. चाहते या सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहे. या सिनेमातील तिच्या भुमिकेकडे सर्वांचेच लक्ष वेधले लागले आहेत. या सिनेमाची शुटींग परदेशात ही झाली आहे. राज्यभरात गौतमीला कोणत्याही कार्यक्रमात नाचण्यासाठी बोलवलं जाते. तिच्या अश्लिल कृत्यामुळे सोशल मीडियावर ती तुफान व्हायरल होत असते. ‘सबसे कातील गौतमी पाटील’ अशी ओळख तिला सोशल मीडियावरून मिळाली आहे.

Exit mobile version