Download App

Gavran Meva: ‘श्यामची आई’ चित्रपटावर ‘गावरान मेवा’चा विशेष भाग

Shyamchi Aai : कडक इंटरटेन्मेंटची (Kadak Entertainment) ‘गावरान मेवा’ (Gavran Mewa) सिरिज तुम्हाला नेहमीच हसवत आलू आहे. पण ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या चित्रपटावर असलेला भाग तुम्हाला हसविण्याबरोबर तुमच्या डोळ्यातही पाणी आणणार आहे. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकावर आधारित चित्रपट 70 वर्षानंतर दिग्दर्शक सुजय डहाके यांनी रुपेरी पडद्यावर आणला आहे. संपूर्ण चित्रपट ब्लँक अँड व्हाईट स्वरुपात दाखवण्यात आला आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आई आणि मुलाच्या दृढ नात्याचे भावविश्व उलगडणाऱ्या या चित्रपटावर कडक मराठीवरील गावरान मेवाचा विशेष भाग प्रदर्शित झाला आहे.

IND vs NED: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतकांच शतक, दिग्गजांच्या पंक्तीत मिळवलं स्थान

ओम भूतकर याने साने गुरुजींची मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. सोबत गौरी देशपांडे, बाल कलाकार शर्व गाडगीळ, संदीप पाठक, ज्योती चांदेकर, सारंग साठ्ये, उर्मिला जगताप, अक्षया गुरव, दिशा काटकर, मयूर मोरे, गंधार जोशी आणि अनिकेत सागवेकर ही मोठी स्टारकास्ट आहे. बहुचर्चित श्यामची आई चित्रपटाची निर्मिती अमृता अरुण राव यांनी केली आहे. साने गुरुजी यांच्या कादंबरीवर आधारित श्यामची आई या चित्रपटाची संहिता प्रसिद्ध लेखक सुनील सुकथनकर यांनी केले आहे.

Katrina Kaif : कतरिना कैफच्या दिवाळी स्पेशल लुकने वेधलं चाहत्यांचं लक्ष

सुजय डहाके आणि सुनील सुकथनकर यांचा हा चित्रपट केवळ पुस्तकाचं चित्ररुप पडद्यावर मांडत नाही तर साने गुरुजी होण्यापर्यंतचं श्यामचं भावविश्व मांडण्याचा प्रयत्न करतो. आईचे संस्कार आणि वडिलांच्या देशभक्तीच्या प्रभाव श्यामवर कसा झाला यांच चित्र उभं करतो.

Tags

follow us