Genelia Deshmukh: ‘या’ कारणामुळे जिनिलीयाचं करिअर संपलं? अभिनेत्रीने केला मोठा खुलासा

Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि पत्नी जिनिलीया देशमुखला (Genelia Deshmukh) ओळखले जाते. त्यांचे लाखो चाहते आहेत. रितेश-जिनिलीया (Ritesh-Genilea) या दोघांना रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. नेहमी ती पती रितेशसोबत कॉमेडी व्हिडिओ (Comedy video) करत असलयाचे दिसून येते. चाहते देखील तिच्या व्हिडिओवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 22T172655.469

Genelia Deshmukh

Genelia Deshmukh: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोड्यांपैकी एक म्हणून अभिनेता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) आणि पत्नी जिनिलीया देशमुखला (Genelia Deshmukh) ओळखले जाते. त्यांचे लाखो चाहते आहेत. रितेश-जिनिलीया (Ritesh-Genilea) या दोघांना रियान आणि राहील नावाची दोन मुलं आहेत. नेहमी ती पती रितेशसोबत कॉमेडी व्हिडिओ (Comedy video) करत असलयाचे दिसून येते. चाहते देखील तिच्या व्हिडिओवर नेहमीच प्रेमाचा वर्षाव करत असल्याचे दिसून येते.


जिनिलीयाचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अभिनेत्रीने लग्नानंतर सिनेमासृष्टीत ब्रेक घेतला होता. मात्र त्यानंतर डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेड’ सिनेमामधून तिने चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले आहे. रितेश- जिनिलीयाच्या याच्या वेड या चित्रपटाने सिनेमा बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असल्याचे दिऊन आले आहे. लग्नानंतर तिने सिनेमा सृष्टीतून ब्रेक घेतल्यावर अनेक वेगवेगळ्या चर्चा रंगत असल्याचे दिसून आले होते.


मात्र त्यावेळी तिने त्याविषयी काही देखील बोलणं केलं नाही. आता जिनिलीयाने यावर सडेतोड उत्तर दिले आहे. नुकतीच जिनिलीया आणि रितेशने करिना कपूरच्या ‘व्हॉट वुमन वॉन्ट’मध्ये हजेरी लावली. या शोमध्ये तिने अनेक सवालांची उत्तर दिली आहे. यावेळी तिने चित्रपटसृष्टीतून ब्रेक का घेतला होता यावर देखील मोठा खुलासा केला आहे. रितेश आणि जिनिलीयाने मनमोकळपणाने त्यांच्या नात्याविषयी मोठा खुलासा केला आहे.

लग्नानंतर रितेशने जिनिलीयाला सिनेमासृष्टी सोडायला भाग पाडले होते, अशी चेच होती. यावर आता उत्तर देत जिनिलीया म्हणाली की, ”लग्न झाल्यावर मला लग्नाला प्राधान्य द्यायचं होतं. लग्नाअगोदर मी हिंदी, तेलुगू, तमिळ चित्रपटसृष्टीत खूप काम करत होते. लग्नानंतर काम थांबवणं हा पूर्णपणे माझा निर्णय असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे. लग्नानंतर जेव्हा मी सिनेमामधून ब्रेक घेतला तेव्हा अनेक चाहत्यांनी मला विविध सवाल विचारले होते.

शाहरुखचा पठाण ठरला ‘किंग’… तर ‘भाई’ की निकली ‘जान’

रितेशचे वडील राजकारणात असल्याने देशमुख कुटुंबीयांनी माझी फिल्मी कारकीर्द संपवली, असे अनेकांनी आरोप लावले होते, परंतु तसे काही पण असल्याचे तिने स्पष्ट केले आहे. याबरोबरच चाहते त्यावेळेस असंही विचारत होते की, तुझं सिनेमामध्ये काम करण रितेशने थांबवलं का? तेव्हा प्रत्येकवेळी मला सगळे एकच उत्तर द्यायचे की, नाही. मलाच खूपकाळ चित्रपटसृष्टीपासून मोठा ब्रेक घ्यायचा होता.

याबरोबरच रितेश यावरं म्हणाला की, चित्रपटसृष्टीपासून ब्रेक घेणं हा सर्वस्वी तिचा निर्णय होता. जिनिलीयाला याअगोदर पुन्हा एकदा सिनेसृष्टीत पदार्पण करायचं होतं पण कोरोनामुळे ते लांबले. मी तिला अनेकवेळा समजावून सांगायचो की तुझं कॅमेऱ्यासमोर असणं तू मिस करत आहेस, यामुळे तू काम करायला सुरुवात कर. जिनिलीया आणि रितेशचं हे वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे.

Exit mobile version