Genelia Deshmukh: ‘प्रिय पप्पा…’, सासरे विलासरावांच्या पुण्यतिथीनिमित्त जिनिलीयाची भावुक पोस्ट!

Genelia Deshmukh Post: बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेमासृष्टीमधील अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) कायम चर्चेत येत असते. २०१२ मध्ये अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न करून जिनिलीया ही देशमुखांची सून झाली. जिनिलीया आणि तिचे सासरे विलासराव देशमुख या दोघांचे नाते खूपच खास होते. त्यांनी सुनेवर कायम मुलीसारखी माया केल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे.   View this post on Instagram […]

Genelia Deshmukh

Genelia Deshmukh

Genelia Deshmukh Post: बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेमासृष्टीमधील अभिनेत्री जिनिलीया देशमुख (Genelia Deshmukh) कायम चर्चेत येत असते. २०१२ मध्ये अभिनेता रितेश देशमुखसोबत लग्न करून जिनिलीया ही देशमुखांची सून झाली. जिनिलीया आणि तिचे सासरे विलासराव देशमुख या दोघांचे नाते खूपच खास होते. त्यांनी सुनेवर कायम मुलीसारखी माया केल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले आहे.


आज त्यांच्या स्मरणार्थ जिनिलीयाने इन्स्टाग्रामवर (Instagram) त्यांच्यासह जुना फोटो शेअर करत भावनिक पोस्ट केली आहे. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीमध्ये सून अभिनेत्री जिनिलीया देशमुखने भावुक पोस्ट लिहिली आहे, सासऱ्यांसह जुना फोटो शेअर केल्याचे बघायला मिळत आहे. हा फोटो रितेश आणि जिनिलीयाच्या लग्नामधील असल्याचे दिसत आहे. या फोटोवर अभिनेत्रीने “मिस यू पप्पा…”असे यावेळी लिहिले आहे.

“प्रिय पप्पा…मला तुम्हाला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे, तुमचे विचार फार प्रभावी आहेत. यामुळे आज तुमच्याशिवाय जगणे आम्हाला कठीण जात आहे. मला खात्री आहे तुम्ही जिथे कुठे असाल ती जागा खूपच खास असेल कारण, प्रत्येकजण कायम हसत राहील याची तुम्ही फार काळजी घेता. पप्पा, तुमची खूप आठवण येते…” असे जिनिलीयाने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये यावेळी सांगितले आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर चाहत्यांनी अनेक कमेंट करून माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना अभिवादन केले आहे.

Siddarth Jadhav: “मी जग बघायला फिरलो अन् आज…”; सिद्धार्थने अरेंज केली आई-बाबांची पहिली फॉरेन टूर

तसेच जिनिलीया आणि रितेश कायम सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे बघायला मिळत असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या कायम संपर्कात राहत असतात. जिनिलीयाप्रमाणे अभिनेता रितेश देशमुख देखील वडिलांच्या आठवणीमध्ये एक खास व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करण्यात आला आहे.

Exit mobile version