Download App

Box Collection: अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ची निराशाजनक कामगिरी; पहिल्या दिवशी कमावले फक्त…

Box Office Collection: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि सैयामी खेर (Saiyami Kher) यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘घूमर’ (Ghoomer) हा सिनेमा १८ ऑगस्ट दिवशी प्रदर्शित झाला. या सिनेमाची गेल्या काही दिवसापासून जोरदार चर्चा सुरु होती. कलाकार सिनेमाचं जोरदार प्रमोशन करत होते. परंतु शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

बॉक्स ऑफिसवर सध्या ‘गदर २’चा धुराळा बघायला मिळत आहे. तर ‘ओएमजी २’ सिनेमा देखील अजून सिनेमागृहांमध्ये चालत आहे. अशातच ‘घूमर’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. ‘घूमर’ला अगोदरच चालणाऱ्या २ सिनेमाशी जोरदार स्पर्धा करावी लागली आहे. अभिषेक बच्चनच्या ‘घूमर’ या सिनेमाला रिव्ह्यू मिळाले आहेत. परंतु हा सिनेमा सनी पाजीच्या ‘गदर २’समोर टिकू शकला नाही. अशा परिस्थितीत चांगला कंटेंट असून देखील ‘घूमर’ला सिनेमागृहांमध्ये प्रेक्षक मिळत नसल्यचे चित्र बघायला मिळत आहे.


चित्रपटाची सुरुवात ही अनीनाची भूमिका साकारणाऱ्या सैयमी खेर पासून सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनीना एक क्रिकेटपटू असते. तिला भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये स्वत:चे एक अनोखे स्थान निर्माण करायचे असते. त्यासाठी तिची निवड देखील करण्यात येते. परंतु तिला बॅटिंग करता येत नाही. आता ती क्रिकेट कशी खेळणार असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु तिच्या नशीबात काही वेगळेच घडल्याचे बघायला मिळाले आहे. सामन्य कुटूंबातील अनीनाचा काही दिवसापूर्वी अपघात होतो. आणि या अपघातामध्ये ती तिचा उजवा हात गमावते. त्यानंतर हतबल झालेली अनीना आत्महत्या करण्याचा निर्णय घ्याचे ठरवते.

Ghoomer Review: क्रिकेटच्या खेळासोबत घडलेल्या आयुष्याची कहाणी

‘घूमर’च्या पहिल्या दिवसाची सुरुवातीचा आकडा समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीच्या आकडेवारीनुसार सिनेमाने फक्त ८५ लाखांची कमाई केल्याचे दिसत आहे. मोठी स्टारकास्ट असलेला ‘घूमर’ आर बाल्की यांनी दिग्दर्शित केला आहे. क्रिकेटवर आधारित या सिनेमाची जोरदार चर्चा देखील होती. परंतु पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे बघता सिनेमाने फारच निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसत आहे. तसेच ‘घूमर’ एका दिव्यांग महिला खेळाडूच्या प्रेरणादायी जीवनप्रवासावर बेतलेला हा सिनेमा आहे. या महिला क्रिकेटपटूची भूमिका अभिनेत्री सैयामी खेरने केली आहे. यामध्ये अभिषेक आणि सैयामीसह अंगद बेदी, शबाना आझमी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Tags

follow us