Ghoomer Review: क्रिकेटच्या खेळासोबत घडलेल्या आयुष्याची कहाणी

Ghoomer Review: क्रिकेटच्या खेळासोबत घडलेल्या आयुष्याची कहाणी

Ghoomer Review: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा सुपुत्र आणि प्रसिद्ध अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) सध्या चांगलाच चर्चेत आहे. ‘घूमर’ (Ghoomer) या सिनेमात सैयमी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी मुख्य भूमिकेत दिसून आले आहेत. (Hindi Cinema) गेल्या काही दिवसांपासून आर बाल्की दिग्दर्शित ‘घूमर’ हा सिनेमा जोरदार चर्चेत आला आहे. हा सिनेमा आज १८ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. त्यापूर्वी चित्रपटाची कथा नेमकी काय आहे? हे जाणून घेणार आहोत.

चित्रपटाची सुरुवात ही अनीनाची भूमिका साकारणाऱ्या सैयमी खेर पासून सुरु झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनीना एक क्रिकेटपटू असते. तिला भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये स्वत:चे एक अनोखे स्थान निर्माण करायचे असते. त्यासाठी तिची निवड देखील करण्यात येते. परंतु तिला बॅटिंग करता येत नाही. आता ती क्रिकेट कशी खेळणार असा प्रश्न उपस्थित होतो. परंतु तिच्या नशीबात काही वेगळेच घडल्याचे बघायला मिळाले आहे. सामन्य कुटूंबातील अनीनाचा काही दिवसापूर्वी अपघात होतो. आणि या अपघातामध्ये ती तिचा उजवा हात गमावते. त्यानंतर हतबल झालेली अनीना आत्महत्या करण्याचा निर्णय घ्याचे ठरवते.

त्यावेळी तिची ओळख पूर्व क्रिकेटपटू पदम सिंह सोढीशी होते. हा क्रिकेटपूट त्याचे सर्वकाही गमावून बसलेला असतो. तसेच तो कायम नशेत बघायला मिळाला आहे. गेल्या काही दिवसांनी पॅडी हा अनीनाचा कोच बनतो आणि डाव्या हाताने तिला फलंदाजी करण्यास शिकवतो. आता या सगळ्यात अनीनाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले असल्याचे दिसत आहे. पॅडी तिचा कोच कसा बनतो? तसेच सैयामी खेरच्या कामाचंही कौतुक. तिने आपली भूमिका अगदी चोखपणे पार पडली आहे.

Ghoomer Movie : अभिषेक-सयामीचा ‘घूमर’ निराशेच्या वातावरणात आशेचा किरण

आपल्या भूमिकेला योग्य न्याय देण्याची मेहनत तिने यावेळी घेतली आहे. अभिषेक आणि सैयमीच्या आयुष्यातील हा एक चांगला सर्वोत्कृष्ट प्रोजेक्ट ठरला आहे. सिनेमात शबाना आजमीने सैयामीच्या आजीची भूमिका साकारली आहे. आपली नात एक चांगली क्रिकेटर व्हावी यासाठी आजी खूप मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. हे सगळं जाणून घेण्यासाठी तु्म्हाला हा सिनेमा पाहावा लागणार आहे.

अभिषेक बच्चनचा घूमर हा सिनेमा एका खऱ्या अॅथलीटच्या आयुष्यावर आधारित आहे. ज्याने हाताला गंभीर दुखापत होऊन देखील ऑलंपिकमध्ये २ गोल्ड मेडेल जिंकल्याचे बघायला मिळाले आहे. सिनेमातील अभिषेक आणि सैयमीचा अभिनय खरचं पाहण्यासारखा आहे. आर.बाल्की हे हिंदी सिनेसृष्टीतील एक सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. ते परत एकदा सिद्ध झाल्याचे दिसत आहे. मिथुनने या सिनेमाला संगीत दिलं आहे. या सिनेमातील गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याचे बघायला मिळाले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube