Ghoomer Movie : अभिषेक-सयामीचा ‘घूमर’ निराशेच्या वातावरणात आशेचा किरण
Ghoomer Movie : “जिंदगी अगर आपके मुंह पर दरवाजा मारे ना तो दरवाजा खोलते नहीं हैं, तोड़ते हैं…” अभिषेक हे वाक्य बोलतो आणि सरकन ‘चायनामन’ गोलंदजाने बॅट्समनला चकमा देऊन क्लीन बोल्ड कराव तसं काहीस आपण बघत राहतो.
आर बाल्की (R Balki) यांनी दिग्दर्शित केलेला आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सयामी खेर (Saiyami Kher), अंगद बेदी (Angad Bedi) यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘घूमर’ प्रदर्शित झाला आहे. अपयशी कारकीर्दनंतर स्वतःला सिद्ध करण्यासाठी अभिषेकला सतत धडपड करावी लागली. सिनेमाला आपण अभिषेकच्या वैयक्तिक आयुष्याशी जोडू शकतो आणि त्यामुळेच या सिनेमाला एक भावनिक किनार मिळते.
आर बालकी सारख्या प्रयोगशील दिग्दर्शकाचा ‘घूमर’ चित्रपट पाहिल्यावर नेमकी गोष्ट काय आहे याचा खरच अंदाज येतो. सगळ्या गोष्ट जेव्हा प्रेडिक्टेबल असतात, त्यावेळेला सिनेमाचा प्रवास हा नेमका कसा झाला हे समजते. व्यक्तिरेखा आणि कथा जेव्हा प्रोमोमधून उलगडते तरीही सिनेमा प्रेक्षकाला खेळवून ठेवतो. कथेच्या चढ-उतारामध्ये भावनिक आंदोलनांमध्ये शिक्षकाला सामील करून घेते, त्यावेळी गोष्ट वेगळ्या उंचीवर पोहोचलेली असते.
अपघातानंतर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका असामान्य खेळाडूची गोष्ट फक्त ‘घूमर’ मांडता येत नाही, तिथपर्यंत तो सीमित राहत नाही. हे सिनेमाचे शक्तिस्थान म्हणायला हवे. आर .बाल्की, ऋषी सेनगुप्ता आणि राहुल वीरमणी यांच्या लिखाणात ‘फ्लाईट’ आहे तर कधी ‘शॉर्ट अप लेंग्थ’ आहे. गोष्ट प्रेडिक्टेबल वाटली तरी त्याचे पीचिंग ‘आऊटसाईड ऑफ द ऑफ स्टंप’ होत नाही. मध्यंतरानंतर सिनेमा ‘स्पिन’ होता होता मध्येच ‘कटर’ होतो आणि अनपेक्षित रित्या तुमच्या मनाचा ठाव घेत ‘इन स्विंग’ टाकतो. तोपर्यंत आपण या सिनेमात गुंतून गेलेलो असतो.
Sonu Sood : लॉकडाऊनमध्ये मी जीवनातील सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली
युवा, गुरु, पा सिनेमांमध्ये दिसलेला अभिषेक बच्चन त्याच्या वेगळ्या अंदाजात अंडरप्ले करताना येथे दिसतो आणि त्याची अभिनयाची समज परिपक्वतेकडे झुकते. मात्र मुठ घट्ट पकडताना हातून वाळू निसटावी आणि तरीही हातात वाळू घट्ट पकडण्याचा प्रयत्न करत असावा अस आपल्याला जाणीवपूर्वक वाटतं. प्रशिक्षक त्याच्या अनोख्या अंदाजात खेळाडूला तयार करतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करण्यासाठी उद्युक्त करतो. त्याने घेतलेली मेहनत आणि आपल्या अपयशावर कुडत बसण्यापेक्षा नवं आव्हान स्वीकारतो.
त्याच्यातील बदलत जाणारा तो, प्रशिक्षकाच्या भूमिकेतील तो… अपयशाने झुकलेला तो आणि आपल्या जगाच्या दृष्टीने अपंग झालेल्या खेळाडूच्या आयुष्यात रंग भरताना नजरेत दिसणारी चमक, सिनेमाची ग्रीप अधिक घट्ट करत जाते. उत्तरार्धात त्याचे स्वागत आहे. त्याच पद्धतीने अभिषेकने सादर केलं. बिग पिंचचा असलेला प्रभाव आणि सादरीकरणात येत जाणारी प्रगल्भता याचा फील देण्यात अभिषेक निश्चितच यशस्वी ठरतो.
Gadar 2 ची सातव्या दिवशी बम्पर कमाई; 300 कोटींचा पल्ला लवकरत गाठणार
अभिनेत्री सयामीचे क्रिकेट खेळणे मेहनत घेतल्याचे जाणवते आणि त्यापेक्षा उत्तम खेळाडू आणि या खेळावर तिचं असलेले प्रेम डोळ्यात दिसतं. मिर्झा मधली बाल सयामी आता या क्षेत्रात सरावाची खेळाडू झाली आहे हे तिच्या सहज वावरामध्ये जाणवतं. क्रिकेट खेळण्यासाठी तिने घेतलेली मेहनत तिच्या डोळ्यातलं पॅशन, शबाना आझमींसोबतच काही सीन्स किंवा अभिषेक बच्चन, अंगद बेदी यांच्याबरोबरच्या सीक्वेन्समध्ये स्वतःची छाप सोडते ही बाब उल्लेखनीय आहे.
आजीची भूमिका खेळासाठी प्रेरणा देत तिचा स्कोर बॅटिंग एनालाईज करते. अभिनेत्री शबाना आझमी यांनी त्यांच्या खासा स्टाईलमध्ये ती उभी केली आहे. अंगद बेदी इतर सिनेमांमध्ये ज्या पद्धतीने स्वतःची छाप सोडतो. तसं करायला त्याला फारसा वाव मिळाला नाही हे देखील तितकच खरं आहे. उत्तरार्धात अमिताभ बच्चन यांचा पाहुणा कलाकार म्हणून असलेला समावेश सिनेमांमध्ये वेगळा रंग भरतो.
जेष्ठ तमाशा कलावंत शांताबाईंना पाच लाखांची मदत; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरित
पद्मनाभ बिंग, निलेश रानडे आणि संदेश कुलकर्णी हे मराठमोळे कलाकार आपली छाप सोडतात. संदेश कुलकर्णी यांचा थेट बिग बी सोबत असलेला एक सीन तर तेवढ्यातल्या तेवढ्यात चोरटी रन काढतो. श्रुती महाजनच कास्टिंग स्टार्स पेक्षा अभिनेत्यांवरचा भर असल्याचे अधोरेखित करते.
विशाल सिनेमाचा कॅमेरा छाया पड छायांचा केलेला वापर आणि भाव परिपोष प्रकाशयोजना, त्यामुळे सीन्स अधिक उठावदार रंगतदार होतात. त्यासोबत संवादातले बिटवीन द लाईन्स पोहोचण्यासाठी मदत होते. अमित त्रिवेदीचे संगीत घूमर सारखी फिरकी घेते आणि मनात रेंगळत राहते.
Archers World Cup : भारतीय तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद; ‘रिकर्व्ह’ प्रकारात ब्राँझपदकांची कमाई
एम एस धोनी, पतियाला हाऊस, अजहर, दिल बोले हडिप्पा, जर्सी, फरारी की सवारी, इक्बाल, लगान, मित्तू, ऑलराऊंडर, अव्वल नंबर या सगळ्या फिल्म्स मध्ये स्वतःची छाप निश्चितच सोडते. चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाला निश्चितच स्पेशल ब्राउनी पॉईंट्स द्यायला पाहिजे. डेस्टिनेशन ठाऊक असताना प्रवास अधिक रंजक आणि चित्त वेधक करण हे आव्हान त्यांनी लिलया पेललेलं आहे.
रंगभूमीवर अनन्यासारखं नाटक किंवा मराठीत सिनेमा झाल्यानंतर या सिनेमाचं तेवढाच अप्रूप किंवा कौतुक वाटत नाही हे देखील तितकंच खर आहे. पण क्रिकेटवर निस्सिम प्रेम करत असाल तर ही गोष्ट निश्चित महत्त्वाची आहे. विक्रम साठे, मुरली कार्तिक आणि बिशन सिंग बेदी यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असलेल्या सहभाग क्रिकेट अधिक फिल्मी न करता गांभीर्याने घेतलेलं आहे. भोवताली इतक्या निराशाजनक वातावरणात आशेचा किरण देणारा म्हणून या सिनेमाकडे आवर्जून पाहता येईल.
का पाहावा- प्रेरणादायी, रंजक, अभिषेक बच्चन आणि आर बाल्कीसाठी
का टाळावा- गोष्ट प्रेडिक्टेबल आहे.
थोडक्यात काय- ‘अनन्या’साधारण प्रेरणादायी गोष्ट