Archers World Cup : भारतीय तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद; ‘रिकर्व्ह’ प्रकारात ब्राँझपदकांची कमाई

Archers World Cup : भारतीय तिरंदाजांचा अचूक लक्ष्यभेद; ‘रिकर्व्ह’ प्रकारात ब्राँझपदकांची कमाई

Archery World Cup : भारतीय तिरंदाजांनी बुधवारी अभिमानास्पद कामगिरी करत मोठे यश मिळवले. कंपाउंड प्रकारातील सांघिक दोन्ही गटात अंतिम फेरीत प्रवेश करून रौप्यपदके मिळवल्यानंतर रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटातही जबरदस्त कामगिरी केली. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत (Archery World Cup) पुरुष व महिल या दोन्ही गटात ब्राँझपदकाची कमाई केली. पुरुषांच्या रिकर्व्ह संघात धीरज बोम्मादेवरा, अतनू दास आणि तुषार शेळके या तिरंदाजांनी यश मिळवले. तर महिलांच्या रिकर्व्ह संघात भजन कौर, सिमरनजीत कौर आणि अंकिता भजन या महिला तिरंदाजांनी यशस्वी कामगिरी केली.

Vinesh Phogat ; एशियन गेम्सपूर्वी भारताला मोठा धक्का, विनेश फोगट स्पर्धेतून बाहेर

रिकर्व्ह प्रकारातील सांघिक गटाच्या फेरीत भारताने दुसरा क्रमांक पटकावला. एकूण 2034 गुण मिळाले. तर दक्षिण कोरियाच्या संघाने 2076 गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला. भारताच्या पुरुष संघाने चांगला खेळ करत मेक्सिकोच्या संघावर 6-0 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्यानंतर कॅनडाचाही पराभव केला. उपांत्य फेरीत मात्र चीनने 6-0 अशा फरकाने भारताचा पराभव केला. त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याचे भारताचे स्वप्न भंगले. आता दक्षिण कोरिया आणि चीन यांच्यात अंतिम फेरीतील लढत होईल. भारतीय संघाने ब्राँझपदकाच्या लढतीत स्पेनवर 6-2 अशी मात केली.

महिला तिरंदाजांनीही केली कमाल

महिला रिकर्व्ह प्रकारात महिला खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. पहिल्या फेरीत जपानवर 6-2 अशी मात केली. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत इटलीचा 5-1 असा पराभव केला. चीन तैपेई संघावर मात्र मात करता आली नाही. चीन तैपेईने भारतावर 6-0 अशी मात केली. भारत आणि मेक्सिको या देशात 4-4 अशी बरोबरी झाली. पहिल्या दोन सेटमध्ये मात मिळाल्यानंतर महिला तिरंदाजांनी पुढील दोन सेट मात्र जिंकले. पाचव्या सेटमध्ये भारतीय महिलांनी तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत 27 गुणांची कमाई केली. या सेटमध्ये मेक्सिकोला मात्र 25 गुण मिळाले. त्यामुळे या सामन्यात भारताने मेक्सिकोवर मात करत ब्राँझपदक मिळवले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube