Vinesh Phogat ; एशियन गेम्सपूर्वी भारताला मोठा धक्का, विनेश फोगट स्पर्धेतून बाहेर
Asian Games 2023: आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारताला मोठा धक्का बसला आहे. स्टार कुस्तीपटू विनेश फोगट आशियाई क्रीडा स्पर्धेमधून बाहेर पडली आहे. 13 ऑगस्ट रोजी विनेश फोगट जखमी झाली होती. या दुखापतीमुळे ती आशियाई स्पर्धेत खेळू शकणार नाही. ती या स्पर्धेत न खेळणे हा भारतीय चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. कुस्तीपटू फोगटने सांगितले की, रविवारी तिला दुखापत झाल्याने ती आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही.
ट्विट करून दिली शस्त्रक्रियेची माहिती
भारताची आघाडीची कुस्तीपटू विनेश फोगटने एक ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने गुडघ्याच्या दुखापतीमुळे 2023 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतून बाहेर असल्याचे लिहिले आहे. यासोबतच 17 ऑगस्टला गुडघ्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचेही तिने सांगितले. स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की, माझ्यासाठी शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय आहे. ही शस्त्रक्रिया 17 ऑगस्ट रोजी मुंबईत होणार आहे.
मात्र, आशियाई स्पर्धेतून विनेश फोगटला वगळणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय चाहत्यांना विनेश फोगटकडून पदकाची अपेक्षा होती, मात्र आता ती या स्पर्धेत सहभागी होणार नसल्याची बातमी समोर आली आहे.
Wrestler Vinesh Phogat ruled out of the 19th Asian Games in Hangzhou following an injury in her left knee during training.
"I will be undergoing surgery on 17th August in Mumbai," her message reads., pic.twitter.com/6l4n2YqEF3
— ANI (@ANI) August 15, 2023
सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न
विनेश फोगटने ट्विटमध्ये म्हटले आहे की, 17 ऑगस्ट रोजी मुंबईत माझी शस्त्रक्रिया होईल, भारतासाठी आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकण्याचे माझे स्वप्न होते, जे मी 2018 मध्ये जकार्ता येथे जिंकले होते.
एक्सप्रेस वेसाठी मंजूर खर्चापेक्षा 14 पट अधिक पैसे उधळले! गडकरींच्या खात्यावर कॅगचे ताशेरे
ती पुढे लिहिते की, या दुखापतीमुळे माझ्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे. राखीव खेळाडूला आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी पाठवता यावे, यासाठी मी माझे म्हणणे संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवले आहे.