राम चरण स्टारर ‘पेड्डी’ मधील ‘चिकिरी चिकिरी’ गाण्याने 5 भाषांमध्ये यूट्यूबवर 200 मिलियन व्ह्यूजचा टप्पा
Ram Charan : राम चरणची आगामी चित्रपट ‘पेड्डी’ जाहीर झाल्यापासूनच सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. अनाउन्समेंट व्हिडीओ, फर्स्ट-लूक पोस्टर्स
Ram Charan : राम चरणची आगामी चित्रपट ‘पेड्डी’ जाहीर झाल्यापासूनच सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे. अनाउन्समेंट व्हिडीओ, फर्स्ट-लूक पोस्टर्स असोत किंवा टीझरचे छोटे स्निपेट्स प्रत्येक अपडेटने ऑनलाईन उत्सुकता आणखी वाढवली आहे. 2026 मधील सर्वात मोठ्या पॅन-इंडिया रिलीजपैकी एक मानला जाणारा हा चित्रपट सतत चर्चेत राहिला आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेले ‘चिकिरी चिकिरी’ हे गाणे या क्रेझला नवी उंची देताच, आपल्या एनर्जेटिक आणि जोशपूर्ण ट्यूनने जगभरातील श्रोत्यांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले.
रिलीज होताच या गाण्याने इतिहास रचला. अवघ्या 24 तासांत 46 मिलियन व्ह्यूज मिळवत ते वर्षातील सर्वाधिक पाहिले आणि पसंत केले गेलेले ट्रॅक्सपैकी एक बनले. आता ‘चिकिरी चिकिरी’ने आणखी एक मोठा टप्पा गाठत पाच भाषांमध्ये यूट्यूबवर 200 मिलियनहून अधिक व्ह्यूज ओलांडले आहेत. त्यासोबतच 2 मिलियनहून अधिक लाइक्स मिळवत त्याची लोकप्रियता कायम आहे.
हे गाणे यूट्यूब शॉर्ट्स आणि इन्स्टाग्राम रील्सवरही विक्रम प्रस्थापित करत आहे, तसेच विविध स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्सवरही प्रभावी आकडे नोंदवत आहे. या यशामुळे ‘चिकिरी चिकिरी’चा ग्लोबल इम्पॅक्ट स्पष्ट दिसून येतो आणि रिलीजला महिने उलटूनही जगभरातून मिळणारे प्रेम हे या गाण्याला खऱ्या अर्थाने चार्ट-टॉपिंग फिनॉमेनन ठरवते.
या मोठ्या यशाचा आनंद मेकर्सनी सोशल मीडियावर व्यक्त करत लिहिले,
“या फेस्टिव्ह सीझनमध्ये डबल सेलिब्रेशन आहे, कारण #ChikiriChikiri ने आणखी एक जबरदस्त माइलस्टोन गाठला आहे चार्टबस्टर #ChikiriChikiri साठी 200 मिलियन+ व्ह्यूज, 2 मिलियन+ लाइक्स, यूट्यूबवर 8.7 लाख+ शॉर्ट्स, इन्स्टाग्रामवर 3 लाख+ रील्स आणि म्युझिक प्लॅटफॉर्म्सवर 60 मिलियन+ स्ट्रीम्स .
म्युझिक लीजेंड ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेले ‘चिकिरी चिकिरी’ हे गाणे मोहित चौहान यांच्या आवाजामुळे आणि बालाजी यांच्या शब्दांमुळे अधिकच खास बनले आहे. अनेक भाषांमध्ये सादर केलेल्या या गाण्याला त्याची कॅची धून, रंगीबेरंगी व्हिज्युअल्स आणि विविध संस्कृतींना सहजपणे जोडणारा चार्म यासाठी भरभरून दाद मिळत आहे. जपान, यूएईसह जगभरातील चाहत्यांनी या गाण्याचा सिग्नेचर स्टेप रिक्रिएट केला असून त्यामुळे चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. ‘पेड्डी’ ची रिलीज तारीख जवळ येत असताना, त्याचा क्रेझ दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
राम चरण, जान्हवी कपूर, जगपती बाबू, शिवा राजकुमार आणि दिव्येंदू शर्मा यांसारख्या दमदार कलाकारांनी सजलेला ‘पेड्डी’ हा चित्रपट बुच्ची बाबू सना यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला असून, तो 27 मार्च 2026 रोजी जगभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
