Ajinkya Rahane: आर बाल्की दिग्दर्शित “घूमर”ची (Ghoomar) चर्चा सोशल मीडियावर (Social media) जोरदार होत असताना या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. प्रसिद्ध कॉमेंटर हर्ष भोगले (Harsha Bhogle) आणि क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांनी या चित्रपटाचं विशेष कौतुक करत असल्याचे बघायला मिळाले आहे. ट्विटरवर या दोघांनी एक खास व्हिडिओ पोस्ट करून या चित्रपटाचं कौतुक केलं आहे.
Was intrigued by a cricket film #GhoomerInCinemas which had people I knew @SaiyamiKher @Imangadbedi @juniorbachchan and made by Balki. Particularly by how they would do the cricket parts. Some thoughts on the film #Ghoomer pic.twitter.com/bXjlOxHapU
— Harsha Bhogle (@bhogleharsha) August 16, 2023
चित्रपटाची कथा आणि कलाकारांच विशेष कौतुक त्यांनी या खास व्हिडिओमधून करून चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. घुमर हा क्रिकेटवर आधारित चित्रपट असून अभिषेक बच्चन, सयामी खेर आणि अंगद बेदी दिग्गज अभिनेत्री शबाना आझमी यांच्या मुख्य भूमिका यात बघायला मिळणार आहेत. आर बाल्की यांच्या दिग्दर्शनाची अनोखी जादू या चित्रपटात बघायला मिळते. हर्षा यांनी चित्रपटाची कथा, कलाकार यांच्याबद्दल अनेक गोष्टी शेयर केल्या आहेत. चित्रपटाची उत्सुकता सगळ्यांना आहेच आणि हा चित्रपट उद्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.
Loved #Ghoomer the film . It’s an emotional film that will inspire you . Cricket was also very good , good luck team ghoomer 😊 .
Releasing 18 Aug.@SaiyamiKher @juniorbachchan pic.twitter.com/YN0QhTgNX8— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) August 17, 2023
टीम ‘घुमर’ सध्या जोरदार प्रमोशन करत असताना या सिनेमाचा पहिला वहिला प्रिमियर मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Melbourne Film Festival) झाला आणि या सिनेमाने सगळ्यांची मन जिंकून स्टँडिंग ओव्हेशन मिळवल. दिग्दर्शक आर बाल्की (Directed by R Balki) यांनी दिग्दर्शित केलेला हा मास्टर पिस सिनेमा येत्या १८ ऑगस्टला प्रदर्शित होणार असून अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan), सयामी खेर अंगद बेदी यांच्या मुख्य भूमिका यात पाहायला मिळणार आहेत.
Ghoomar: अभिषेक बच्चनचा ‘घुमर’ मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमध्ये ठरला सुपरहिट!
क्रिकेटवर आधारित असलेला हा सिनेमा अनेक भावनांनी गुंफलेला आहे. सध्या बॉक्स ऑफिसवर (box office) अनेक उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित होत आहेत. नुकतेच सनी पाजीचा ‘गदर २’ आणि खिलाडीचा ‘ओएमजी २’ हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाले. दोन्ही सिनेमा प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरले.