Shravan Ajay Bane: ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या (Shravan Ajay Bane) सिनेमात रेडिओ जॉकी (Radio Jockey) श्रवण अजय बने हा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ‘गुड वाईब्स ऑन्ली’ (Good Vibes Only) या नावावरून आपल्याला चांगलच समजल असणार आहे. वेबफिल्म (Web Film) किती सकारात्मकतेने भरलेली आहे. आयुष्यातील ही सकारात्मकता लवकरच प्लॅनेट मराठी ओटीटीवर (Marathi OTT) बघायला मिळणार आहे. जुगल राजा निर्मित, दिग्दर्शित ‘गुड वाईब्स ऑन्ली’ या वेबफिल्मचे पोस्टर झळकवण्यात आले आहे.
यामध्ये श्रवण अजय बने, आरती केळकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. याअगोदर आरजे श्रवण आणि गायिका आरती केळकर यांनी आपल्या जादुच्या आवाजाने चाहत्यांना भुरळ पडली आहे. आता आपल्या उत्तम अभिनयाने ते चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी सज्ज होणार आहेत. ‘गुड वाईब्स ऑन्ली’ची कथा देखील जुगल राजा यांची आहे. तसेच दोन व्यक्तिंभोवती फिरणारी ही कथा सर्फिंग या वॉटर स्पोर्ट्सवर बेतली आहे.
आता यामध्ये नेमकं काय बघायला मिळणार आहे, हे वेबफिल्म आल्यावर समजणार आहे. परंतु नावावरून आणि पोस्टरवरून तरी यामध्ये काहीतरी चागंलीच उत्सुकता वाढत असल्याचे बघायला मिळत आहे. या वेबसिनेमाविषयी दिग्दर्शक जुगल राजा म्हणतात की, आपल्या आजुबाजुला कायम चांगल्या लहरींचा प्रवाह असणार असल्याची चर्चा होत आहेत, तर आपले आयुष्य आपसुकच सकारात्मक होते. हेच दाखवण्याचा प्रयत्न या वेबसिनेमामध्ये करण्यात आला आहे, आणि यासाठी आम्हाला प्लॅनेट मराठीची चांगलीच साथ मिळाली आहे.
तसेच यापेक्षा चांगलं काही असणार नसल्याची खात्री देखील देण्यात आली आहे. हा विषय देखील चाहत्यांना पसंतीत येणार आहे. तर प्लॅनेट मराठी ओटीटीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात की, आम्ही कायम चाहत्यांना अनेक प्रकारचे विषय देण्याचा प्रयत्न करत असतो. या वेबफिल्मची संकल्पना देखील थोडी हटके आहे. सर्फिंग या विषयावर देखील सिनेमा बनू शकणार आहे, ही संकल्पना मुळामध्ये मराठी सिनेसृष्टीसाठी रंजक ठरणार आहे. आतापर्यंत पाश्चिमात्य सिनेमामध्ये आपण हा विषय अनेकवेळा बघितला आहे. प्रथमच हा विषय मराठी सिनेमात हाताळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.