Mumbai Police : बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता गोविंदाच्या (Govinda) पायाला मंगळवारी गोळी लागल्याने सध्या तो क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. गोविंदा पहाटेच्या वेळी बाहेर जाण्यासाठी निघाला असतानाच चुकून बंदुकीतून मिसफायर झाल्याने हे अपघात घडले होते. तर दुसरीकडे या प्रकरणात मुंबई पोलिसांनी देखील तपास सुरु केला असून माहितीनुसार या प्रकरणात अभिनेता गोविंदाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात अभिनेता गोविंदाने दिलेल्या उत्तरवर मुंबई पोलीस (Mumbai Police) समाधानी नसून या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पुन्हा एकदा मुंबई पोलीस गोविंदाला समन्स पाठवू शकते.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गोविंदाने या प्रकरणी मुंबई पोलिसांना नोंदवलेल्या जबाबावर मुंबई पोलीस समाधानी नाही आणि त्यांना या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करायची आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मुंबई पोलीस अधिकारी दया नायक (Daya Nayak) यांनी रुग्णालयात जाऊन चौकशी केली आहे मात्र ते समाधानी नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पुन्हा एकदा चौकशीसाठी मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याची माहिती देखील पीटीआयने दिली आहे. तर मिसफायर हे अपघात होता की षडयंत्र याबाबत कोणतीही माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
प्रकरण काय?
1 ऑक्टोबरच्या पहाटे अभिनेता गोविंदाच्या पायाला गोळी लागली होती. या घटनेत गोविंदा जखमी झाल्याने त्याला क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तो पहाटेच्या वेळी बाहेर जाण्यासाठी निघाला असताना चुकून बंदुकीतून मिसफायर झाल्याने हा अपघात झाला होता. त्यानंतर या अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली होती. घटनास्थळी दाखल होताच पोलिसांनी बंदूक ताब्यात घेत पुढील तपास सुरु केला होता.
‘सावरकरांबद्दल आदर म्हणूनच मी 1983 ला …’, आत्मचरित्रात सुशीलकुमार शिंदेंनी केला मोठा खुलासा
गोविंदाच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचं झालं तर गोविंदा सध्या अभिनयापासून दूर आहे. अनेक वर्षांपासून तो एकाही चित्रपटात दिसला नाही. त्याचे म्युझिक व्हिडिओ मात्र अधूनमधून येत असतात. याबरोबरच गोविंदा काही रियलिटी शोमध्ये दिसला आहे. टिव्हीवर गोविंदा बऱ्याचदा पत्नी सुनीताबरोबर दिसत असतो.