Download App

GUMRAAH : गुमराह सिनेमाचा ट्रेलर रिलीज; आदित्य-मृणाल पहिल्यांदाच एकत्र

  • Written By: Last Updated:

अभिनेता आदित्य रॉय कपूर व अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या आगामी ‘गुमराह’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. या सिनेमाच्या टीझरने आधीच प्रेक्षकांची एस्साइटमेंट वाढवली आहे. या ट्रेलरला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळाली आहे. या ट्रेलरला पाहून दर्शक सिनेमाटी वाट पाहत आहेत.

हा ट्रेलर 2 मिनीट व 23 सेकंदाचा  आहे. या ट्रेलरची सुरुवात मृणाल ठाकूरच्या संवादाने होते. यानंतर सिनेमाचा हिरो आदित्य रॉय कपूरची एंट्री होते. यावेळी आदित्य हा एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहे. यावेळी ट्रेलरमध्ये एक नाही तर दोन-दोन आदित्य नजर येत आहेत.

Sudhir Mungantivar : सांगितलं होतं झाडाला फळ येतील, पण झाडाशीच नातं तोडलं…

गुमराह एक ‘मर्डर मेस्त्री’ फिल्म आहे. या सिनेमामध्ये आदित्य रॉय कपूरच्या व्यतिरिक्त मृणाल ठाकूर ही सिनेमात एका पोलिस इंसपेक्टरचा रोल करताना दिसत आहे. मृणालच्या व्यतिरिक्त यामध्ये रोनित रॉय देखील दिसत आहे. या सिनेमाच्याद्वारे पहिल्यांदा आदित्य आणि मृणाल एकत्र दिसून आले आहेत.

शायराना अंदाज, शब्दांचा खेळ अन् अमित देशमुखांचं भाषण; आली विलासरावांची आठवण

गुमराह हा तेलुगू सिनेमा ‘थडम’ या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. हा सिनेमा 7 एप्रिल 2023 रोजी रिलीज होणार आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य हा ‘द नाइट मॅनेजर’ या वेबसिरीजमध्ये दिसून आला होता. या वेबसिरीजमधील आदित्यच्या अभिनयाचे अनेकांनी कौतुक केले होते.

Tags

follow us