Gururaj Jois Passed Away : आमिर खानच्या प्रसिद्ध अशा लगान चित्रपटाचे सिनेमॅटोग्राफर गुरूराज जोइस यांचे निधन झाले. सोमवारी 27 नोव्हेंबरला त्यांचे बेंगळुरू येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांनी वयाच्या केवळ 53 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांची पत्नी आणि एक मूलं असा परिवार आहे. तर लगानसह त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्या सिनेमॅटोग्राफीची जादू दाखवली आहे.
ललित पाटील ड्रग्स प्रकरणात मोठी अपडेट; सुषमा अंधारे यांना नाशिकमधून निनावी पत्र…
गुरूराज जोइस यांनी सिनेमॅटोग्राफीचे काम केलेल्या चित्रपटांबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यामध्ये मुंबई से आया मेरा दोस्त, शूटआऊट अॅट लोखंडवाला, मिशन इस्तंबूल, एक अजनबी, जंजीर आणि गली गली चोर है या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच त्यांचा सर्वात नावाजलेला चित्रपट म्हणजे अभिनेता आमिर खानचा प्रसिद्ध असा लगान हा चित्रपट. ज्याची सिनेमॅटोग्राफी गुरूराज जोइस यांनी लिलया पेलली.
राहुल द्रविडला मुदतवाढ पण अनेक प्रश्न अनुत्तरित, क्रिकेटप्रेमींमध्ये संभ्रम
त्यामुळे गुरूराज जोइस यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककली पसरली आहे. सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यामध्ये आमिर खान प्रोडक्शन्सच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून गुरूराज जोईस यांच्या निधनावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘गुरूराज जोईस यांच्या निधनाबद्दल ऐकूण खूप दुःख झाले. त्यांनी कॅमेऱ्यामागील कामाने लगान चित्रपट जिवंत केले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.’ असं म्हणत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे.
राहुल द्रविडला मुदतवाढ पण अनेक प्रश्न अनुत्तरित, क्रिकेटप्रेमींमध्ये संभ्रम
दरम्यान गुरूराज जोइस हे हिंदी चित्रपट सृष्टीतील उत्कृष्ट कॅमेरा वर्कसाठी ओळखले जातात. त्यांच्या कामाचे अनेकांनी कौतुक केले आहे.सुरूवातीला गुरूराज जोइस यांनी सहाय्यक सिनेमॅटोग्राफर म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये मुख्य सिनेमॅटोग्राफर म्हणून आपले कोशल्या दाखवण्याची संधी मिळाली आहे.