Gyaarah Gyaarah OTT Release: सिनेमाच्या जगात टाइम ट्रॅव्हलवर अनेक चित्रपट आणि सिरीज बनवल्या गेल्या आहेत. लोकांनाही असा कंटेंट पाहणे खूप (Gyaarah Gyaarah ) आवडते. त्यामुळेच त्यावर चित्रपट आणि सिरीज (series) बनवल्या (OTT) जातात. आता पुन्हा एकदा खूप प्रतिक्षेनंतर, एक रोमांचक कथा आणि मनोरंजक कथानक असलेले थ्रिलर सिरीज ओटीटीवर प्रदर्शित झाले आहे. सस्पेन्स आणि विज्ञानावर आधारित ही कथा असणार आहे. चला तर मग जाणून घ्या, ही सिरीज तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता.
‘ग्यारह ग्यारह’ कधी आणि कुठे बघायचे
ही काल्पनिक थ्रिलर सिरीज ‘ग्यारह ग्यारह’ आज म्हणजेच 9 ऑगस्ट 2024 रोजी रिलीज झाली आहे. हा शो कुठे बघायचा असा प्रश्न येतो तेव्हा. तर ‘ग्यारह ग्यारह’ Zee5 वर रिलीज झाला आहे. या थ्रिलर शोमध्ये कृतिका कामरा, राघव जुयाल, धैर्य करवा यांसारखे दिग्गज कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय गौतमी कपूर, हर्ष छाया, विवेक जमाना, खुशी भारद्वाज, आकाश दीक्षित, विदुशी मांडुली यांसारखे कलाकारही या शोमध्ये दिसले आहेत.
‘ग्यारह ग्यारह’ ची कथा कशी आहे
ZEE5 वर रिलीज झालेली ही सिरीज तीन कालखंड (1920, 2001, 2016) जोडते. शोमध्ये राघव जुयाल एका प्रामाणिक आणि मेहनती पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. तो एक केस सोडवण्यासाठी निघाला आहे, ज्याचा एक भाग त्याने त्याच्या बालपणात जगला आहे. कृतिका कामरा महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. या शोची कथा खूपच रंजक आहे आणि आशा प्रकारे लिहिली गेली आहे की पुढे काय होणार आहे याचा अंदाज लावणे फार कठीण आहे.
फिक्शन प्रेमींसाठी उत्तम शो
उमेश बिश्त दिग्दर्शित या सिरीजची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता यांनी केली आहे. चित्रपटाची कथा पूजा बॅनर्जी आणि संजय शेखर यांनी लिहिली आहे. जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर आणि फिक्शन सिरीज पाहण्याची आवड असेल तर हा शो फक्त तुमच्यासाठी बनवला आहे. कथेची तीव्रता तुम्हाला गुंतवून ठेवते आणि सिरीजमध्ये पुढे काय होणार आहे याची प्रेक्षक देखील अंदाज घेत आहेत.