Download App

Happy Birthday Asha Bhosale : …म्हणून खय्याम यांनी आशाताईंकडून सरस्वतीची शपथ वदवली

  • Written By: Last Updated:

Happy Birthday Asha Bhosale : आपल्या सुमधूर स्वरांनी संगीत क्षेत्रात चौफेर कामगिरी बजावत गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या पद्मविभूषण आशाताई भोसले नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करत आहेत. आशा भोसले यांच्या कारकीर्दीला एक भलतंच वेगळं वळण देणारा सिनेमा म्हणजे उमराव जान. आज आशाताईंच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त याचं चित्रपटाच्या वेळी घडलेला आशाताईंच्या करिअरला कलाटणी देणारा एक किस्सा आपण जाणून घेऊ…

फडणवीस-पवार पंचतारांकित शेतकरी, त्यांना दुष्काळाचं.. ठाकरे गटाचे टीकास्त्र

काय आहे आशाताईंचा तो किस्सा?

आशाताई म्हणजे नटखट, खट्याळ, अल्लड किंवा मादक गाणी, हे समीकरण ओ. पी. नय्यर आणि आर. डी. बर्मन यांनी काही गाण्यांमधून मोडायचा प्रयत्न केला होता. पण, आशाताई या ज्येष्ठ भगिनी लता मंगेशकर यांच्या बरोबरीच्या अष्टपैलू आणि गंभीर गायिका आहेत. उमराव जानची गाणी याचं भान आणून देणारी होती. मुझफ्फर अलींना रेखामध्ये उमराव जान दिसणं आणि संगीतकार खय्याम यांना आशाताईंमध्ये उमराव जानचा स्वर सापडणं, या दोन्ही गोष्टी आश्चर्यकारक होत्या.

Jawan Box Office Collection: किंग खानच्या चित्रपटाने पहिल्याच दिवशी रचला इतिहास; कमावले ‘इतके’ कोटी

‘दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए’ या गाण्याने उमराव जानच्या गाण्यांच्या रेकॉर्डिंग्जचा श्रीगणेशा झाला. याच गाण्याच्या वेळी खय्याम यांच्यावर ‘बस एक बार मेरा कहा मान लीजिए’ अशी आशाताईंची आर्जवं करण्याची पाळी आली. प्रश्न होता स्वरपट्टीचा आशाताईंना उडत्या चालीची, वरच्या पट्टीतली गाणी गाण्याची सवय होती. तोच त्यांचा सुपरिचित ‘आवाज’ होता, तीच ओळख होती. खय्यामसाहेबांनी या गाण्याची तर्ज खालच्या पट्टीत बांधली होती. ते आशाताईंना मानवेना. हा आपला आवाज नाही, अशा आवाजातलं गाणं रसिकांना आवडणार नाही. अशी त्यांची समजूत झाली होती. रेकॉर्डिंग रूममध्ये वातावरण तणावपूर्ण होतं.

अखेर खय्याम यांच्या पत्नी आणि गायिका जगजीत कौर यांनी अॅरेंजमेंटमध्ये मग्न असलेल्या खय्याम यांना सांगितलं की, आशाताईंना तुमच्याशी बोलायचंय. आशाताईंनी त्यांच्या मनातली धास्ती बोलून दाखवली. तुम्हाला माझ्या आवाजातलं गाणं हवंय तर माझा सूर का नाही लावू देत, असा त्यांचा सवाल होता. खय्याम म्हणाले, हा उमराव जानचा सूर आहे. म्हणून, आपण एक काम करू. एक टेक मी म्हणतो तसा करू. त्यानंतर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला हवा तसा दुसरा टेक करू. मी सगळा स्वरमेळही बदलून घेईन त्यानुसार. खय्याम यांनी गरज पडल्यास दुसरा टेक घेईनच, अशी आपल्या मुलाची, प्रदीपची शपथ घेतली. त्याचवेळी, पहिल्या टेकमध्ये 100 टक्के जीव ओतीन, अशी देवी सरस्वतीची शपथ त्यांनी आशाताईंकडून वदवून घेतली.

मग टेक झाला,ओके झाला, आता सगळे धडधडत्या हृदयांनी रेकॉर्डेड गाणं ऐकायला बसले, गाणं सुरू झालं. सहा मिनिटं पिनड्रॉप सायलेन्स, आशाताई डोळे मिटून गाणं ऐकत होत्या. गाणं संपल्यावर म्हणाल्या, हा माझा आवाज होता? मला माहितीही नव्हतं की, मी अशीही गाऊ शकते. तुम्ही ठेवा हाच टेक. मला नको माझ्या शैलीतला टेक, पुढे ‘इन आँखों की मस्ती के’ आणि ‘जुस्तजू जिसकी थी’सह उमराव जानची इतर गाणीही खय्याम यांच्या मनाप्रमाणे ध्वनीमुद्रित झाली आणि आशाताई अशाही गाऊ शकतात, हे सगळ्या देशाला कायमचं कळून गेलं.

Tags

follow us