Happy Birthday Ashish Vidyarthi: आशिष विद्यार्थी यांनी खलनायकाची भूमिका साकारत हिंदी सिनेमासृष्टीपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. कन्नड सिनेमातून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी तब्बल ११ भाषांमधील २०० पेक्षा जास्त सिनेमामध्ये काम केले आहे.
बॉलिवूडमधील (Bollywood) सुप्रसिद्ध अभिनेते आशिष विद्यार्थी (Ashish Vidyarthi) ५७व्या वर्षी दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला आहे. २५ मे रोजी आशिष विद्यार्थी यांनी रुपाली बरुआ (Rupali Barua) यांच्याशी लग्न करत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. यामुळे ते होरादर चर्चेत आले आहेत, लग्नानंतर पहिल्यांदाच आशिष विद्यार्थी यांनी दुसऱ्या बायको (Second wife) सोबतचा फोटो शेअर केला आहे.
तसेच काही सिनेमामध्ये आशिष यांनी खलनायकाची भूमिका साकारत मोठ्या पडद्यावर जोरदार कल्ला केला आहे. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी हिंदी सिनेमासृष्टीपासून ते साऊथ इंडस्ट्रीपर्यंत आपले मोठे स्थान निर्माण केले आहे. ‘द्रोखला’ सिनेमसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला होता. आज (१९ जून) आशिष विद्यार्थी यांचा वाढदिवस आहे. आशिष विद्यार्थी यांचा जन्म १९ जून १९६२ रोजी कुन्नूर येथे झाला आहे. त्यांचे वडील गोविंद विद्यार्थी हे मल्याळी कलाकार होते आणि त्यांची आई रबी या प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना होत्या.
यामुळेच आशिष लहानपणापासूनच कला आणि रंगभूमीशी जोडले गेले होते. आशिष यांचा जन्म केरळमध्ये झाला असला, तरी त्यांचे बालपण दिल्लीमध्ये गेले आहे. अगदी लहान वयातच ते दिल्लीत आले आणि येथून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. दिल्लीमध्ये राहून त्यांनी थिएटरला सुरुवात केली आणि खूप प्रसिद्धी मिळवली. आशिष विद्यार्थी यांनी आपल्या करिअरची सुरुवात कन्नड सिनेमा ‘आनंद’मधून केली होती. परंतु, १९९१मध्ये ‘काल संध्या’ या सिनेमाद्वारे त्यांना बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक मिळाला होता.
Adipurush ला प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद; फोटो शेअर करत दिल्या ‘खास’ शुभेच्छा
यानंतर आशिष यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी पडद्यावर एकापाठोपाठ एक दमदार भूमिका साकारले आहेत. आशिष विद्यार्थी ‘१९४२: अ लव्ह स्टोरी’, ‘सरदार’, ‘बिच्छू’, ‘द्रोखला’, ‘बर्फी’, ‘बाजी’, ‘नाजायज’ यांसारख्या अनेक सिनेमामध्ये ते आपल्या चाहत्यांना दिसून आले आहे. हिंदी सिनेमाव्यतिरिक्त त्यांनी ‘एके-४७’, ‘वंदे मातरम’, ‘सैनिक’, ‘नंदी’ यांसारख्या अनेक कन्नड सिनेमामध्ये देखील काम केले आहे.
आशिष विद्यार्थी यांनी अनेक सिनेमामध्ये काम केले आहे. परंतु बहुतांश सिनेमामध्ये त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली आहे. एवढेच नाही, तर आशिष यांचे नाव बॉलिवूडमधील ‘सर्वोत्कृष्ट’ खलनायकांच्या यादीमध्ये सामील केले जाते. आशिष विद्यार्थी यांनी ‘बिच्छू’, ‘हसीना मान जाएगी’, ‘कहो ना प्यार है’, ‘जोड़ी नंबर १’ आणि ‘जिद्दी’यांसारख्या सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांनी साकारलेल्या खलनायकाला देखील चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.