धि गोवा हिंदु असोसिएशनचे रंगभूमीवर पुनरागमन; 25 डिसेंबरपासून “सुभेदार गेस्ट हाऊस” घेऊन 25 डिसेंबरपासून रंगभूमीव येणार

Subhedar Guest House हे एक नवे कोरे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Subhedar Guest House

Goa Hindu Association returns to the stage coming to the stage from December 25 with “Subhedar Guest House” : मराठी नाट्यसृष्टीला तसेच रसिक प्रेक्षकांसमोर सातत्याने दर्जेदार नाटके व संगीत नाटके सादर करणारी अग्रगण्य संस्था “धि गोवा हिंदु असोसिएशन” काही काळानंतर पुन्हा एकदा रंगभूमीची सेवा करण्यासाठी सज्ज झाली आहे. धि गोवा हिंदु असोसिएशन आणि सुकल्प चित्र यांच्या संयुक्त विद्यमाने “सुभेदार गेस्ट हाऊस” हे एक नवे कोरे मराठी नाटक येत्या २५ डिसेंबरपासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Epstein Files New Photos : ‘एपस्टाईन बॉम्ब’ फुटला, 68 नवीन फोटो अन् चॅट रिलीज; बिल गेट्स महिलांसोबत दिसले

धि गोवा हिंदु असोसिएशन, कल्पक सदानंद जोशी आणि अमरजा गोडबोले हे या नाटकाचे निर्माते आहेत. या नाटकाचा पुण्यातील पहिला प्रयोग २५ डिसेंबरला यशवंतराव चव्हाण, कोथरूड तर मुंबईतील पहिला प्रयोग २६ डिसेंबरला शिवाजी मंदिर येथे संपन्न होणार आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, युवा नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर अशांतता ,पत्रकारांना मारहाण

“सुभेदार गेस्ट हाऊस” या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा विजय केंकरे यांनी सांभाळली आहे. अभिनेता सौरभ गोखले, शंतनू मोघे, आनंद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, सना कुलकर्णी, रोहित देशमुख, आनंद पाटील यांच्या महत्वपूर्ण भूमिका या नाटकात पहायला मिळणार आहेत.नाटकाचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये, संगीत अजित परब, गीत वैभव जोशी, प्रकाश योजना शीतल तळपदे, रंगभूषा शरद विचारे आणि वेशभूषा मंगल केंकरे यांची आहेतर सूत्रधार म्हणून श्रीकांत तटकरेराजेंद्र पै काम पाहत आहे.

बांगलादेशात पुन्हा हिंसाचार, युवा नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर अशांतता ,पत्रकारांना मारहाण

धि गोवा हिंदु असोसिएशन पुन्हा एकदा रंगभूमीवर सक्रिय होत असल्याची बातमी समजताच नाट्यरसिकांमध्ये उत्सुकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. आशयघन कथा, कसदार दिग्दर्शन आणि अनुभवी तांत्रिक टीम यांच्या जोरावर “सुभेदार गेस्ट हाऊस” हे नाटक प्रेक्षकांसाठी एक खास पर्वणी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

follow us