Download App

Manisha Koirala Birthday: मनिषा कोयरालाची मराठी अभिनेत्यासोबतची जुनी Love Story माहिती आहे का?

Happy Birthday Manisha Koirala : एकेकाळी आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवुडवर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मनीषा कोईराला. तर याच मनीषा कोईरा हिचा आज 53 वा वाढदिवस. तिच्या वाढदिवसानिमित्त बॉलीवूड मधील योगदानाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

मूळची नेपाळची असणाऱ्या मनिषाने (Manisha Koirala) 1989 साली ‘फेरी भेटौला’ या नेपाळी चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली. त्यानंतर 1991 साली सौदागर या चित्रपटातून तिने बॉलीवूड मध्ये पदार्पण केलं. (Hindi Cinema) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर (box office) फारशी कमाई केली नाही. त्यानंतर मनीषा ही ‘1942: अ लव्ह स्टोरी’ या चित्रपटात दिसली. या चित्रपटाने चांगली कमाई करत मनीषाला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले. त्यानंतर तिने ‘अग्नि साक्षी’, ‘इंडियन, गुप्त: द हिडन ट्रूथ’, ‘कच्चे धागे’, ‘कंपनी’ आणि ‘एक छोटी सी लव स्टोरी’ या चित्रपटांमध्ये काम केले.


मनीषाचा ‘अग्नि साक्षी’ हा चित्रपट विशेष गाजला होता. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) हे मुख्य भूमिकेत दिसले होते. (Social Media) चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी ते दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. हळहळू त्यांच्यामधील जवळीक वाढत गेली. त्यानंतर त्यांनी संजय लीला भंसाळी यांच्या खामोशी’ चित्रपटात एकत्र काम केले. त्या दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहून त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. पण काही दिवसांनंतर त्यांच्यामध्ये भांडणे होऊ लागली आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम लागला.

मनीषाने नेपाळमधील उद्योगपती सम्राट दहल यांच्याशी १९ जून २०१० मध्ये लग्न केले. त्या दोघांची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली होती. हळूहळू त्यांच्या भेटीगाठी वाढत गेल्या आणि मैत्रिचे रुपांतर प्रेमात झाले होते. पण त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. आणि २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Bharat Jadhav: भरत जाधवचं नवं नाटक येणार चाहत्यांच्या भेटीला; पोस्ट शेअर करत म्हणाला…

२०१२ मध्ये मनिषाला गर्भाशयाच्या कॅन्सरचे निदान झाले होते. उपचारानंतर 2015 ला ती यातून मुक्त झाली. तिच्या या कॅन्सरच्या लढ्यावर तिने हिलिंग नावाचं पुस्तक लिहीत तिचे कॅन्सरशी झुंज देतांनाचे अनुभव या पुस्तकात शेअर केलेत.

कॅन्सरवर मात केल्यानंतर मनिषाने 2018 पुन्हा bollywood मध्ये पदार्पण केलं. अभिनेता संजय दत्तची biopic असणाऱ्या संजू चित्रपटात तिने दिवंगत अभिनेत्री नर्गिस यांची भूमिका साकारली होती. त्यानंतर मनीषा शहजादा या चित्रपटात दिसली. मनिषाला तिच्या अभिनयाबद्दल फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. मनीषा बद्दल सांगायची खास गोष्ट म्हणजे मनिषाचे आजोबा हे नेपाळचे 22 वे पंतप्रधान होते…

Tags

follow us