Bharat Jadhav: भरत जाधवचं नवं नाटक येणार चाहत्यांच्या भेटीला; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Bharat Jadhav: भरत जाधवचं नवं नाटक येणार चाहत्यांच्या भेटीला; पोस्ट शेअर करत म्हणाला…

Bharat Jadhav: नाटक, सिरीयल आणि सिनेमा यांमधून चाहत्यांच्या भेटीला कायम येणारा भरत जाधव (Bharat Jadhav) हा त्याच्या अभिनयानं चाहत्यांची नेहमी मनं जिंकतो. भरतनं चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. भरतनं अनेक नाटकांमध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. आता त्याचं नवं नाटक लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. (social media) या नव्या नाटकाविषयी नुकतीच भरतनं एक खास पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)


भरत जाधवने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्याने सांगितले आहे की, “रसिक प्रेक्षकहो, आपणा सर्वांच्या आशीर्वादाने ‘सही रे सही’ या नाटकाला आज 21 वर्ष पूर्ण झाले आहेत. आपल्या लाडक्या ‘भरत’ ने गेल्या 30 वर्ष आपणा सर्वांना खळखळून हसवल्यानंतर तो आपल्यासमोर पुन्हा येत आहे… यंदा हसवायला नाही तर आपल्याला हळवं करायला… नवं नाटक घेऊन… कधीही न पाहिलेल्या नव्या भूमिकेत…” भरतनं या पोस्टला कॅप्शन दिले आहे, ‘लवकरच..’.

भरतच्या ‘सही रे सही’ या नाटकाला चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली होती. आता त्याच्या नव्या नाटकाची चाहते मोठ्या उत्सुकतेने वाट पाहत आहे.भरत जाधवने शेअर केलेल्या या पोस्टला अनेक चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स केल्या आहेत. एका चाहत्यांनी कमेंट केली, ‘दादा तुला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!’ तर दुसऱ्या एका चाहत्याने कमेंट केली आहे की, ‘अभिनंदन आणि हाऊसफुल्ल शुभेच्छा भरत!’

Akshay Kumar Indian Citizenship: खिलाडीला मिळाले भारताचे नागरिकत्व; पोस्ट शेअर करत म्हणाला…

मराठी नाटकातून भरत जाधवने एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. श्रीमंत दामोदर पंत या नाटकात ‘गोड गोजिरी लाज लाजरी’ हे गाणं म्हणत भरत जाधवने रंगमंचावर दमदार एन्ट्री केली होती. तसेच अगं बाई अरेच्चा!, जत्रा, पछाडलेला, बकुळा नामदेव घोटळे, साडे माडे तीन, येड्यांची जत्रा या हटक्या सिनेमामधील भरतच्या अभिनयाला चाहत्यांनी मोठी पसंती दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube