Happy Birthday Naseeruddin Shah: बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांचे आज (२० जुलै) ७२वा वाढदिवस साजरा करत आहेत. (bollywood) नसीरुद्दीन शाह यांचं नाव अनेक कलाकारांमध्ये कायम घेतलं जातं असत, अनेक मोठ मोठ्या भूमिकांपासून ते छोट्या भूमिकांपर्यंत आपल्या अभिनयाचा कल चाहत्यांची मने नेहमीच जिंकत आले आहेत.
उत्तम कला सिनेमासोबत अनेक सिनेमामधून देखील त्यांनी मनोरंजन विश्वामध्ये आपला मोठा ठसा उमटवल्याचे दिसून येते. नसीरुद्दीन यांना बॉलिवूडमध्ये एकदाही टिपिकल हिरो अशी ओळख त्यांना मिळाली नाही. परंतु आजवर देखील त्यांनी अनेक भूमिका केल्या आहेत. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म २० जुलै १९५० दिवशी एका नवाब कुटुंबात झाला होता. अलीगढ मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली आहे, त्यांनी अभिनयात करिअर करायचे मनावर घेतले होते.
तसेच नसीरुद्दीन यांच्या वडिलांना त्यांचा हा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले होते. तरी देखील वडिलांच्या इच्छेविरुद्ध जात असताना नसिरुद्दीन यांनी आपल्या करिअर म्हणून अभिनयाला पहिली मान्यता दिल्याचे दिसून येत आहे. त्यांनी जरी अभिनय क्षेत्र निवडले असले, तरी देखील त्यांच्यासाठी या क्षेत्रामध्ये टिकून राहणं हा महत्वाचा आणि कठीण भाग असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावेळी सुरुवातीच्या काळात नसीरुद्दीन शाह यांना त्यांच्या साध्या उंचीमुळे कायम नकार देत असायचे. परंतु याच दरम्यान त्यांची भेट श्याम बेनेगल यांच्याशी झाली होती. यानंतर त्यांचं नशीबच बदल्याचे दिसून आले आहे. नसीरच्या आत दडलेला कलाकार श्याम यांनी बघितला होता. नसीरुद्दीन शाह यांच्या पहिल्या सिनेमाचे नाव ‘निशांत’ असे होते. परंतु हा सिनेमा काही विशेष जादू दाखवला नसल्याचे त्यांनी सांगितले. या सिनेमातून त्यांचे कलागुण मात्र दिसून आले होते. यानंतर त्यांनी ‘स्पर्श’, ‘इक्बाल’, ‘कर्मा’ असे अनेक हटके सिनेमे दिले आहेत.
लोकप्रिय अभिनेते अतुल परचुरेंचा कॅन्सरशी लढा; लग्नाच्या 25 व्या वाढदिवसादिवशी समजली बातमी
नसीर यांची फिल्मी कारकीर्द कायम हिंदी सिनेमांपुरती कधीच मर्यादित नव्हती. तर त्यांनी इंग्रजी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी अशा अनेक वेगवेगळ्या भाषांमध्ये हटके सिनेमे केले आहेत. अभिनेता नसीरुद्दीन शाह यांनी आपल्या आयुष्यात तब्बल ६० वर्षे सिनेमासृष्टीला समर्पित केल्याचे दिसत आहे. या काळामध्ये त्यांनी १००पेक्षा जास्त बॉलिवूड सिनेमा केले आहेत.
त्यांच्या सिनेमा कारकिर्दीविषयी सांगायचे, तर ते बॉलिवूडमधील सर्वात मोठा अभिनेता आहे. त्यांनी ‘त्रिदेव’, ‘विश्वात्मा’, ‘जाने भी दो यारों’, ‘अ व्हेनस डे’ आणि ‘कर्मा’ सारखे समीक्षकांनी आवडलेले सिनेमे केले आहेत. तर, दुसरीकडे ‘डर्टी पिक्चर’, ‘इश्किया’ आणि ‘मोहरा’ या सारख्या सिनेमात देखील त्यांनी यशस्वी घोडदौड केली आहे.