Guru Sri Ganesan Passed Away : भरतनाट्यमचे लोकप्रिय गुरू आणि वादक श्री गणेशन (Sri Ganesan) यांचे निधन झाले आहे. ओडिशामधील भुवनेश्वर येथे एका सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नृत्य करत असताना ते मंचावर कोसळले आहेत. त्यानंतर त्यांना लगेचच हॉस्पटलमध्ये हलविण्यात आले होते. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Odisha | Bharatanatyam Guru Sri Ganeshan passed away in Bhubaneswar. He had collapsed after a performance and doctors declared him dead at a hospital pic.twitter.com/gTAmSbAzeV
— ANI (@ANI) June 10, 2023
त्यांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. श्री गणेशन हे मूळचे मलेशियाचे येथील रहिवासी असून त्यांचे वय 60 वर्षे होते. आपल्या भरतनाट्यम सादरीकरणासाठी ते भारतामध्ये आले होते. परंतु भुवनेश्वर येथे ते ‘गीत गोविंद’ यावर आपले नृत्य सादर करत असतानाच त्यांना मृत्यू आला.
Kriti Senon: क्रितीने मंदिरातच केला दिग्दर्शकाला Kiss; पुजाऱ्यांचा संताप, म्हणाले…
मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती उत्तम होती. अगदी सादरीकरण करेपर्यंत ते उत्तम होते. ते सादरीकरण करत असताना त्यांना अचानक एका क्षणाला मंच प्रकाशमान झाला आणि जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु त्या आधीच त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितनुसार त्यांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे.