Download App

Hardeek Joshi: राणादा अन् पाठकबाईंसोबत ‘या’ कलाकारांचा शिंदे गटात प्रवेश ! 

Hardeek Joshi: सध्या अनेक कलाकार मंडळी राजकीय पक्षात प्रवेश केल्याचं बघायला मिळत आहे. तसेच दोन दिवसाअगोदर आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे राहुल कनाल यांनी धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आता मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी देखील शिंदे गटाचा झेंडा हातात घेतल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात राजकीय (Maharashtra Politics) घडामोडींना चांगलंच वेग आला असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिव सिनेमा सेनेच्या लोगोचं अनावरण करण्यात आले आहे.  यावेळी अनेक मराठी कलाकारांनी शिंदेच्या शिवसेनेत (Shiv Sena) प्रवेश केल्याचं बघायला मिळाले आहे. मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेत्री अदिती सारंगधर माधव देवचक्के, अमोल नाईक, प्रतीक पाटील, हार्दिक जोशी, अक्षया देवधर (Akshaya Deodhar) यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश (Shinde group) केला आहे.

गेल्या काही वर्षांपासून चाहत्यांचे मनोरंजन केल्यानंतर आता सिनेसृष्टीतल्या कलाकारांसाठी काम करण्याची वेळ आली आहे, असं हार्दिकने यावेळी सांगितले आहे.  परंतु आपल्या माणसांसाठी काम करायचं असेल किंवा लढायचं असेल तर आपल्या लोकांची साथ पाहिजेच. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असे नेते आहेत, की ते कधीही आपलं म्हणणं ऐकून घेऊ शकणार आहेत. आम्ही सर्वजण एकत्र येऊन नक्कीच चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असं अदिती सारंगधर हिने यावेळी भाष्य केले आहे.

Maharashtra Political Crisis: ‘महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी कलाकारांच्या भन्नाट प्रतिक्रिया चर्चेत, म्हणाले…

दरम्यान गेल्या काही महिन्यामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांनी आपल्या आवडत्या पक्षामध्ये एन्ट्री केली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या कलाकारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मराठी ‘बिग बॉस’ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री मेघा धाडे देखील भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मेघाने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. यावेळेस भाजपच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde) देखील सोबतीला होत्या. तर २०२० मध्ये प्रिया बेर्डेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. परंतु  गेल्या वर्षी त्यांना राष्ट्रवादीला राम-राम ठोकला होता, आणि भाजपचा झेंडा हाती घेतला.

Tags

follow us