Download App

ॲनिमलनंतर आता बॉबी दिसणार औरंगजेबाच्या भूमिकेत; ‘या’ साऊथ सुपरस्टारशी होणार स्पर्धा

Bobby Deol New Movie: (Bobby Deol ) बॉबी देओल (Bobby Deol New Movie) गेल्या काही काळापासून सतत नकारात्मक भूमिका करत आहे.

Bobby Deol New Movie: बॉबी देओल (Bobby Deol) गेल्या काही काळापासून सतत नकारात्मक भूमिका करत आहे. या भूमिकांमध्येही त्याला पसंती दिली जात आहे. तो खलनायक म्हणून आपली दुसरी इनिंग अशा प्रकारे पुढे नेत आहे की चाहते त्याची पहिली इनिंग विसरले आहेत. आता बॉबी देओलची इंडस्ट्रीत पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने व्याख्या केली जात आहे. प्रकाश झा (Prakash Jha) यांच्या आश्रम (Ashram) मालिकेत बाबाची भूमिका साकारल्यानंतर अभिनेत्याचे दिवस परतले आहेत. अलीकडेच त्याला ‘ॲनिमल’ या चित्रपटात पसंती मिळाली. आता तो पुन्हा एकदा साऊथ चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे.

बॉबी देओल आता पवन कल्याणच्या ‘हरिहर वीर मल्लू’ (Hari Hara Veera Mallu) या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात तो मुघल सम्राट औरंजेबची भूमिका साकारणार आहे. चित्रपटाचा टीझर आला आहे आणि त्यात बॉबी देओलच्या दिसण्याने पुन्हा एकदा चाहत्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. हरिहर वीर मल्लूचा टीझर प्रदर्शित झाला असून तो खूप पसंत केला जात आहे. यात पवन कल्याणची (Pawan Kalyan) मुख्य भूमिका असून तो या चित्रपटात बॉबी देओलचा सामना करणार आहे.

All the Best: ‘ऑल द बेस्ट’ नाटकाला उदंड प्रतिसाद; कलाकारांच्या नवीन संचाचा 50वा प्रयोग होणार संपन्न

टीझर पाहिल्यानंतर चाहते म्हणाले? 

टीझर पाहिल्यानंतर चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, बॉबी देओलचा लूक अप्रतिम आहे. तर दुसऱ्या व्यक्तीने लिहिले, माझा पहिला दिवस, पहिला शो पवन कल्याणला पाहण्याची खात्री झाली आहे. तर आणखी एकाने लिहिले की, ओह माय गॉड, पवन कल्याण आणि बॉबी देओलचे सोनेरी संयोजन, लॉर्ड बॉबी पुन्हा येत आहे. मुघल सम्राटाच्या भूमिकेत तो कहर करतोय.अशा सध्या कॉमेंट्स येत आहेत. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्याचे बजेट जवळपास 200 कोटी रुपये आहे. हा चित्रपट 2024 मध्ये येणार आहे.

follow us

वेब स्टोरीज