Download App

Heeramandi: संजय लीला भन्साळींनी सेटवर अदितीला ठेवलं उपाशी? कारण सांगत ‘बिब्बोजान’ म्हणाली…

Heeramandi : संजय लीला भन्साळी यांची आगामी वेब सिरीज 'हीरामंडी' (Heeramandi ) 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्सवर स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे.

  • Written By: Last Updated:

Heeramandi : संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची आगामी वेब सिरीज ‘हीरामंडी’ (Heeramandi ) 1 मे 2024 रोजी नेटफ्लिक्सवर (Netflix) स्ट्रीम करण्यासाठी सज्ज आहे. या वेब सीरिजमध्ये अदिती राव हैदरी (Aditi Rao Hydari) हिने ‘बिब्बोजन’ची भूमिका साकारली आहे. या मालिकेत तिला ही भूमिका कशी मिळाली याचा नुकताच अभिनेत्रीने खुलासा केला. एका सीनसाठी दिग्दर्शकाने तिला दिवसभर उपाशी राहण्यास सांगितले होते, असा खुलासाही आदितीने केला आहे.

संजय लीला भन्साळी यांनी अदिती हैदरीला सेटवर उपाशी ठेवले होते

आदितीला मुलाखतीत विचारण्यात आले की तिने संजय लीला भन्साळींसोबत कसे काम केले, तेव्हा अभिनेत्रीने तिचा अनुभव सांगितला आणि म्हणाली- ‘भंसाली जे काही करतात ते खूप भावनिक आहेत. त्यांना अजून चांगले काम करायचे आहे. सिनेमा बनवणाऱ्या प्रत्येक कलेवर त्याचे खरे प्रेम आहे आणि मी म्हणेन की मी सेटवर स्वतःला पूर्णपणे समर्पण केले आहे, कारण जेव्हा तुम्ही संजय लीला भन्साळीच्या सेटवर जाता तेव्हा तुम्हाला स्पंज व्हायचे असते. जेणेकरुन तुम्ही त्याचा प्रत्येक सल्ला आत्मसात करू शकाल.

‘आज जेवू नकोस’

ती पुढे म्हणाली की, ‘एक दिवस संजय लीला भन्साळींनी मला उपाशी ठेवले कारण मला एक सीन करायचा होता, ज्यामध्ये मला रागात दिसायला पाहिजे होते. म्हणून त्यांनी मला म्हणाले की, तू आज जेवू नकोस.’ भन्साळींसोबत काम करण्याबद्दल अदिती म्हणाली, ‘सेटवर त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींमधून मला खूप काही शिकायला मिळाले. सेटवर संजय सरांसोबत, तुम्हाला संपूर्ण वेळ ते काय बोलत आहेत यावर लक्ष केंद्रित करावे लागत असत.

Gharat Ganpati: प्रत्येक घरातली आणि घरातील प्रत्येकाची गोष्ट; ‘घरत गणपती’ 26 जुलैला रुपेरी पडद्यावर

संजय लीला भन्साळी यांचा ‘हिरामंडी: द डायमंड बाजार’ पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. मल्टीस्टारर कथा आणि हीरामंडीचा आलिशान सेट पाहण्यासाठी लोक उत्सुक आहेत. मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, अदिती राव हैदरी, रिचा चढ्ढा, संजीदा शेख, शर्मीन सहगल, फरदीन खान हीरामंडीमध्ये एकत्र दिसणार आहेत.

follow us