मोठी बातमी, शाहरुख अन् गौरी खानविरुद्ध मानहानीचा खटला, समीर वानखेडे यांचा मानहानीचा आरोप

Shah Rukh Khan : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने

  • Written By: Published:
Shah Rukh Khan

Shah Rukh Khan : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान विरोधात वरिष्ठ पोलिस अधिकारी समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने मानहानीचा खटला दाखल केला आहे. नेटफ्लिक्स वेब सिरीज “बॅड्स ऑफ बॉलीवूड” मध्ये त्यांची वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रतिमा मलिन करण्यात आली असल्याचा आरोप वानखेडे यांनी केला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी आर्यन खान (Aryan Khan) दिग्दर्शित नेटफ्लिक्स मालिकेतील “द बॅड्स ऑफ बॉलीवूड” (The Bads of Bollywood) मधील भूमिकेबद्दल नेटफ्लिक्स (Netflix) आणि शाहरुख खानविरुद्ध (Shah Rukh Khan ) दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. समीर वानखेडे यांनी शाहरुख खान आणि गौरी खान (Gauri Khan) यांची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंट यांच्याकडून 2 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे.

नेमकं काय म्हणाले समीर वानखेडे

समीर वानखेडे यांनी दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, दिल्ली उच्च न्यायालयात अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांच्या मालकीच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड, ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स आणि इतरांविरुद्ध कायमस्वरुपी आणि अनिवार्य मनाई आदेश, घोषणा आणि नुकसान भरपाईच्या स्वरुपात दिलासा मिळावा यासाठी मानहानीचा खटला दाखल केला आहे.

रेड चिलीजने तयार केलेल्या आणि नेटफ्लिक्सने त्यांच्या “द बॅडीज ऑफ बॉलीवूड” या टेलिव्हिजन मालिकेचा भाग म्हणून प्रसारित केलेल्या खोट्या, दुर्भावनापूर्ण आणि बदनामीकारक व्हिडिओमुळे प्रतिमा मलिन झाली असं निवेदनात समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.

Abhijit Sawant : अभिजीत सावंत पुन्हा चर्चेत; प्रेमरंग सनेडो गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

follow us