शाहरुख खानला ‘जवान’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार! 33 वर्षांच्या कारकिर्दीतील पहिला सन्मान

राष्ट्रपती भवनात शाहरुखला ‘जवान’ (2023) या सुपरहिट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.

Shahrukh Khan Wins National Award For Jawan

Shahrukh Khan Wins National Award For Jawan : बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याला अखेर राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात झालेल्या समारंभात शाहरुखला ‘जवान’ (2023) या सुपरहिट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. विशेष म्हणजे, 33 वर्षांच्या दीर्घ कारकिर्दीत हा शाहरुखचा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार ठरला आहे. त्यामुळे हा क्षण त्याच्यासाठी तसेच चाहत्यांसाठीही ऐतिहासिक ठरला.

राष्ट्रीय पुरस्कार हा पहिल्यांदाच

शाहरुख खाननं (Shahrukh Khan) आपल्या कारकिर्दीत असंख्य ब्लॉकबस्टर चित्रपट दिले (National Award) आहेत. फिल्मफेअर, आंतरराष्ट्रीय पुरस्कार अशा असंख्य गौरवांनी तो आधीच सन्मानित झाला आहे. पण राष्ट्रीय पुरस्कार हा पहिल्यांदाच त्याच्या नावावर आला आहे. याआधी शाहरुखला पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आलं होतं. मात्र, या पुरस्कारानं त्याच्या मेहनतीला, जिद्दीला आणि प्रेक्षकांशी असलेल्या (Jawan) नात्याला एक वेगळाच दर्जा दिला आहे.

बिजी शेड्यूलमधूनही उपस्थिती

शाहरुख खान सध्या आपल्या पुढील मोठ्या चित्रपट ‘किंग’ च्या शूटिंगमध्ये (Bollywood) व्यस्त आहे. तरीही त्यानं खास वेळ काढत राष्ट्रपती भवनातील समारंभाला हजेरी लावली आणि स्वतः हा पुरस्कार स्वीकारला. समारंभ संपताच तो पुन्हा थेट शूटिंगसाठी रवाना झाला. हे त्याच्या कामावरील निष्ठेचं उत्तम उदाहरण असल्याचं चाहत्यांनी सांगितलं.

‘जवान’मधील अभिनयाला दाद

एटली दिग्दर्शित ‘जवान’मध्ये शाहरुखच्या दमदार अभिनयाची सर्वत्र चर्चा झाली होती. नयनतारा, विजय सेतुपती आणि दीपिका पदुकोण या कलाकारांसोबत शाहरुखनं साकारलेली भूमिका चाहत्यांप्रमाणेच समीक्षकांनाही भावली. त्यामुळे हा पुरस्कार शाहरुखच्या योग्यतेचा मान ठरला, असं मानलं जातं.

पुढील प्रकल्प आणि नवीन तयारी

अलीकडेच शाहरुखनं मुलगा आर्यन खानच्या दिग्दर्शनातील डेब्यू वेब सिरीज ‘द बॅड्स ऑफ बॉलीवूड’ मध्ये खास कॅमिओ केला आहे. त्याचबरोबर सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित ‘किंग’ या मोठ्या चित्रपटाची तयारी सुरू आहे. या चित्रपटात सुहाना खान पहिल्यांदाच वडिलांसोबत झळकणार असून, दीपिका पदुकोणही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 33 वर्षांच्या वाटचालीनंतर मिळालेला हा पहिला राष्ट्रीय पुरस्कार शाहरुख खानसाठीच नव्हे, तर त्याच्या चाहत्यांसाठीही अभिमानाचा क्षण ठरला आहे.

follow us