BSF Jawan : सहावेळा फ्लॅग मीटिंग अन् 84 वेळा वाजली शिट्टी; BSF जवानाच्या सुटकेची इनसाईड स्टोरी

Pak Returns BSF Jawan Purnam Kumar Shaw : पंजाबमधील फिरोजपूर येथील आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेल्या बीएसएफचे जवान पीके शॉ (BSF Jawan Purnam Kumar Shaw) यांची बुधवारी (दि.१४) अटारी सीमेवरून भारतात सुखरूप वतन वापसी झाली आहे. शॉ हे २३ एप्रिल २०२५ पासून जवळपास ५०४ तास पाकिस्तान रेंजर्सच्या (Pakistan Army) ताब्यात होते. शॉ यांची सुटका नेमकी कशी झाली? यासाठी कोण-कोणते प्रयत्न करण्यात आले? याचबद्दलची ही इनासाईड स्टोरी…
सहावेळा फ्लॅग मीटिंग अन् ८४ वेळा वाजली शिट्टी;
पाकिस्तानी रेंजरस्च्या ताब्यात असलेल्या पी, के. शॉ यांच्या सुखरूप सुटकेसाठी बीएसएफने अथक प्रयत्न केले होते. ५०४ तासांपासून पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या बीएसएफ जवानाची सुटका करण्यासाठी सहापेक्षा जास्त ध्वज (फ्लॅग) बैठका घेण्यात आल्या, तर आंतरराष्ट्रीय सीमेवर ८४ वेळा शिट्टी वाजवण्यात आली. याशिवाय सीओ पातळीवरील बैठकांव्यतिरिक्त, बीएसएफ आणि रेंजर्सच्या उच्च अधिकाऱ्यांनीही या विषयावर चर्चा केल्याची माहिती आता समोर आली आहे.
Today BSF Jawan Purnam Kumar Shaw, who had been in the custody of Pakistan Rangers since 23 April 2025, was handed over to India: BSF
Constable Purnam Kumar Shaw had inadvertently crossed over to Pakistan territory, while on operational duty in area of Ferozepur sector on 23rd… pic.twitter.com/PnHB6wl69V
— ANI (@ANI) May 14, 2025
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात बीएसएफ आणि पाकिस्तानी रेंजर्समध्ये सहाहून अधिक ध्वज बैठका झाल्या. ज्यात रेंजर्सच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून हिरवा कंदील मिळताच, BSF च्या सैनिकाला सोडण्यात येईल असे सांगितले गेले. शॉ यांच्या सुटकेसाठी बीएसएफकडून दररोज प्रयत्न केले जात आहेत. तसेच पाकिस्तानी रेंजर्सला चर्चेसाठी बोलवण्यासाठी दिवसातून अनेकदा शिट्टी वाजवण्यात आल्याचेही सांगितले जात आहे.
फ्लॅग मीटिंगसाठी काय केले जाते?
फ्लॅग मीटिंसाठी शिट्टी वाजवण्याबरोबरच ध्वजदेखील दाखवला जातो. असे केवळ समोरील देशाच्या जवानांना चर्चेसाठी बोलवणे हाच असतो. शॉ यांच्या सुटकेसाठी अशाप्रकारे अनेकदा शिट्टी वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. भारतीय जवानांकडून शिट्टी वाजवल्यानंतर अनेकदा पाकिस्तानी सैन्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यावेळी एकच दिवसात अनेकदा भारतीय जवानांकडून शिट्टी वाजवून पाकिस्तानी रेंजर्सना चर्चेसाठी बोलवण्याचा प्रयत्न करण्यात आले. या काळात पाकिस्तानी रेंजर्सकडून अनेकदा फ्लॅग मीटिंगकडे जाणून बुजून दुर्लक्ष केल्याचेही सांगितले
जात आहे. त्यानंतर अखेर शॉ यांच्या सुटकेचा मुद्दा राजकीय हस्तक्षेप करून आणि हा मुद्दा डीजीएमओच्या बैठकीत उपस्थित केला.
Video : पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानला पुणेकरांचा दणका; 1500 कोटींची डिल कॅन्सल
ज्यावेळी एखादा जवान सीमा ओलांडून पलिकडील देशात प्रवेश करतो त्यावेळी अशी प्रकरणा साधारणपणे कमांडंट पातळीवर सोडवली जातात. कधी कधी सीमा ओलांडून गेलेले जवानाचा प्रवेश करण्याचा गंभीर हेतू नसल्याचे चौकशीत समोर आले तर, त्याची काही तासात सुटकादेखील केली जाते. पण जर सीओ पातळीवर प्रकरण सोडवले गेले नाही, तर डीआयजी पातळीवर याबाबत चर्चा होते. यानंतर, आयजी पातळीवर चर्चा होते. जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा कुटनितीचे प्रयत्न केले जातात.
ब्रेकिंग : भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या चीनला दणका; मुखपत्र ‘ग्लोबल टाईम्स’चे अकाऊंट ब्लॉक
जवानांना परत पाठवण्याची प्रक्रिया कशी?
देशाची सीमा ओलांडून दुसऱ्या देशात प्रवेश केलेल्या संबंधित जवानाची ओळख आणि हेतू चुकून सीमापलिकडे गेल्याची खातरजमा केली जाते. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात ‘फ्लॅग मीटिंग्स’ घेतल्या जातात, जिथे दोन्ही देशांचे लष्करी अधिकारी संवाद साधतात. जर जवान चुकून गेला आहे आणि त्याच्याकडे कोणताही गुप्त हेतू नव्हता, हे स्पष्ट झालं तर त्याला परत पाठवण्याची प्रक्रिया सुरु होते. अनेकवेळा भारतीय जवान चुकून LOC पार करतात आणि पाकिस्तानच्या ताब्यात जातात. अशा वेळी, दोन्ही देशांमधील संवादानंतर अशा जवानांना परत पाठवलं गेलं आहे. अशाचप्रमाणे चुकून भारतीय हद्दीत प्रवेश केलेल्या पाकिस्तानच्या जवानांनादेखील परत पाठवण्यात आले आहे.
#WATCH | पश्चिम बंगाल: BSF जवान पूर्णम कुमार शॉ की पत्नी रजनी शॉ ने कहा, "आज सुबह जब हमें फोन आया कि चिंता मत कीजिए, आपके पति भारत आ गए हैं और वह बिल्कुल ठीक हैं, तो हम बहुत खुश हुए। मैंने अपने पति से भी बात की और वह शारीरिक रूप से स्वस्थ हैं… उन्होंने (ममता बनर्जी) मुझसे कहा… https://t.co/WtglJvLHlU pic.twitter.com/yiXRZanYAE
— ANI_HindiNews (@AHindinews) May 14, 2025