पाकिस्तानचा पुढील पंतप्रधान कोण? धक्कादायक नाव आलंय समोर, कुणाचा दावा..

पाकिस्तानचा पुढील पंतप्रधान कोण? धक्कादायक नाव आलंय समोर, कुणाचा दावा..

Shahid Afridi Will be Next PM of Pakistan : भारताने पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानात (India Pakistan War) हाहाकार उडाला आहे. भारताच्या या कारवाईची पाकिस्तानात जोरदार चर्चा सुरू आहे. पाकिस्तानी नागरिक आपल्याच सरकारवर टीका करत आहेत. त्यांच्याकडच्या सोशल मीडियावर सरकार विरोधाचे वारे जोरात वाहत आहेत. पण, सरकार आणि सैन्याचे समर्थन करणारेही अनेक आहेत. यात माजी क्रिकेटपटू शाहीद अफरीदीही (Shahid Afridi) आहे. भारतावर टीका करण्याची एकही संधी अफरीदी सोडत नाही. यातच आता या अफरीदीबद्दल मोठी बातमी समोर आली आहे. शाहीद अफरीदी पाकिस्तानचा पुढचा पंतप्रधान असेल असा दावा केला जात आहे.

सोशल मीडिया युजर्स म्हणत आहेत की शाहीद अफरीदी पुढील इमरान खान होण्याचे इच्छित आहेत. पाकिस्तानचा पंतप्रधान व्हावं अशीही त्याची इच्छा आहे. याआधी अफरीदीने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यास भारतीय सैन्यालाच जबाबदार धरलं होतं. या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा अतिरेक्यांनी बळी घेतला होता. यानंतर अफरीदी सातत्याने भारताविरोधात गरळ ओकत आहे. रविवारी कराची शहरात एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत बोलताना अफरीदीने पाकिस्तानी सैन्याचं कौतुक केलं. यावेळी त्याने भारतीय सैन्यावर खोटेनाटे आरोप केले.

PM मोदी अन् भारतीय सैन्याचा वर्मी घाव, ट्रम्प तात्यांचा पडला भाव; ‘त्या’ दोन घटनांनी चित्रच पालटलं

अफरीने रॅलीत केलेल्या भाषणावर सोशल मीडिया युजर्सने कॉमेंट्सचा पाऊस पाडला आहे. अनेकांनी अफरीदीची तुलना इमरान खानशी (Imran Khan) केली आहे. इमरान खानही आधी क्रिकेटपटू होते. यानंतर राजकारणात येऊन थेट पाकिस्तानचं पंतप्रधान पद मिळवलं होतं. याच मार्गावर अफरीदीची वाटचाल सुरू आहे असे अनेकांना वाटत आहे.

एका युजरने एक्सवर लिहिले की जर कुणी अशा पद्धतीने बोलत असेल तर याचा अर्थ तो व्यक्ती राजकारणात प्रवेश करतोय. मला विश्वास आहे की अफरीदीचं पुढील लक्ष्य पाकिस्तानच्या राजकारणात इमरान खान होण्याचं आहे. @MoneyMystery नावाच्या अकाउंटवरून ट्विट केलं आहे की अफरीदी नवा इमरान खान बनण्याच्या तयारीत आहे. अफरीदी लवकरच पाकिस्तानचा पंतप्रधान होणार आहे. असे लोक जे कायम भारतावर टीका करतात त्यांना पाकिस्तानी लोक पसंत करतात.

सिंधू पाणीवाटप करार स्थगितच..

युद्धविरामानंतर सिंधू पाणीवाटप (Indus Water Treaty) करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या मुद्द्याव रणधीर जयस्वाल यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. सिंधू पाणी करार हा परस्पर विश्वास आणि सद्भावनेच्या आधारावर झाला होता. परंतु, पाकिस्तानने या गोष्टी कधीच मानल्या नाहीत. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला समर्थन देऊन या तत्वांना कमकुवत करण्यात आलं. 23 एप्रिल रोजी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीनुसार भारताने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला स्थायी रुपाने समर्थन देणं बंद करत नाही तोपर्यंत हा करार स्थगितच राहील.

“त्यावेळी अमेरिकेशी व्यापारावर चर्चा नाहीच फक्त..”, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube