“त्यावेळी अमेरिकेशी व्यापारावर चर्चा नाहीच फक्त..”, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडला

“त्यावेळी अमेरिकेशी व्यापारावर चर्चा नाहीच फक्त..”, भारताने डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खोडला

India Pakistan Ceasefire : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध (India Pakistan Ceasefire) थांबलं. दोन्ही देशांच्या संघर्षात मध्यस्थी करून युद्धविराम केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी केला होता. सर्वात आधी डोनाल्ड ट्रम्प यांनीच ट्विट करत ही माहिती जगाला दिली होती. व्यापार रोखण्याचा इशारा दोन्ही देशांना दिल्यानंतर त्यांनी शस्त्रसंधीची तयारी दाखवली असे ट्रम्प म्हणाले होते. परंतु, आता ट्रम्प यांचा हा दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे.  7 मे ते 10 मे पर्यंतच्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत आणि अमेरिकेच्या नेत्यांत फक्त सैन्य स्थितीवर चर्चा झाली. व्यापाराच्या मुद्द्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज पत्रकार परिषदेत याबाबत सविस्तर माहिती दिली. ते पुढे म्हणाले, पाकिस्तन बरोबरचे संबंध ताणले गेलेले होते. त्यावेळी सैनिकी कारवाई सुरू असताना अमेरिका आणि भारताचे नेतृत्व एकमेकांच्या संपर्कात होते. परंतु, यावेळी व्यापाराबाबतीत कोणतीच चर्चा झाली नाही. 7 मे ते 10 मे पर्यंतच्या काळात भारत आणि अमेरिकेत लष्करी परिस्थितीवर चर्चा झाली. परंतु, या चर्चेत व्यापाराचा मुद्दा कुठेच नव्हता.

“POK खाली करा, काश्मीर प्रश्नी कुणाचीही मध्यस्थी चालणार नाहीच”; भारतानं ठणकावलं!

काय म्हणाले होते ट्रम्प ?

दरम्यान, काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी एक भाषण केलं होतं. दोन्ही देश युद्धविरामासाठी तयार झाल्यास अमेरिका त्यांना व्यापारात मदत करेल. जर या देशांनी युद्धविरामाची तयारी दाखवली नाही तर अमेरिका त्यांच्याशी कोणताच व्यापार करणार नाही अशी भूमिका मी दोन्ही देशांच्या नेतृत्वाशी चर्चा करताना घेतली होती. त्यानंतर दोन्ही देश युद्धविरामासाठी तयार झाले असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. परंतु, भारताने ट्रम्प यांचा हा दावा स्पष्ट शब्दांत फेटाळला आहे.

सिंधू पाणीवाटप करार स्थगितच..

युद्धविरामानंतर सिंधू पाणीवाटप (Indus Water Treaty) करारावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. या मुद्द्याव रणधीर जयस्वाल यांनी अतिशय स्पष्ट शब्दांत उत्तर दिलं. सिंधू पाणी करार हा परस्पर विश्वास आणि सद्भावनेच्या आधारावर झाला होता. परंतु, पाकिस्तानने या गोष्टी कधीच मानल्या नाहीत. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला समर्थन देऊन या तत्वांना कमकुवत करण्यात आलं. 23 एप्रिल रोजी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीनुसार भारताने निर्णय घेतला आहे की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला स्थायी रुपाने समर्थन देणं बंद करत नाही तोपर्यंत हा करार स्थगितच राहील.

‘चायना मेड’ हत्यारे फेल, पाकिस्तानचे अब्जावधी बुडाले.. ऑपरेशन सिंदूरचं आणखी एक यश

follow us
  • fb
  • instagram
  • youtube