‘चायना मेड’ हत्यारे फेल, पाकिस्तानचे अब्जावधी बुडाले.. ऑपरेशन सिंदूरचं आणखी एक यश

India Pakistan Tension : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला (Pahalgam Terror Attack) भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला. या मोहिमेत (Operation Sindoor) भारतीय सैन्याने थेट पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या मोहिमेत पाकिस्तानचे मोठे नुकसान तर झालेच शिवाय पाकिस्तानकडील चिनी हत्यारांची पोलखोल झाली. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरला प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या चिनी बनावटीच्या हत्यारांची मदत घेतली ती सगळीच हत्यारे अपयशी ठरली.
सतर्क असलेल्या भारतीय सैन्याने चिनी रॉकेट धडाधड हाणून पाडले. चला तर मग जाणून घेऊ या की कंगाल पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर किती महागात पडले? चिनी हत्यारांत पाकिस्तानचे किती पैसे बुडाले?
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या मोहिमेत सैन्याने (Indian Army) पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीरमधील (Pak Occupied Kashmir) एकूण 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. या एअर स्ट्राईकमध्ये 100 पेक्षा जास्त अतिरेकी मारले गेले. भारताच्या या कारवाईला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने (Pakistan Army) भारताचे लष्करी तळ आणि नागरिकांवर हल्ल्याचे प्रयत्न केले.
काय सांगता! चीनने चक्क लढाऊ विमानांचे टेक्निकच चोरले, ‘या’ देशांच्या फायटर जेटचे बनवले डुप्लीकेट
यासाठी चिनी बनावटीच्या हत्यारांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला. तुर्कीच्या ड्रोनचाही उपयोग करण्यात आला. पण भारताच्या मजबूत एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence System) एकही ड्रोन आणि मिसाईल हल्ला यशस्वी होऊ दिला नाही. ड्रोन आणि मिसाईल हवेतच नष्ट करण्यात आले. याचा मोठा धक्का पाकिस्तान सैन्याला बसला आहे.
काही रिपोर्ट्सनुसार तणावाच्या काळात चीन पाकिस्तानला सातत्याने हत्यारांचा पुरवठा करत होता. परंतु चीनने (China Pakistan Relation) असे सर्व दावे नाकारले आहेत. दहशवादविरुद्ध चीन आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण चीनचा खरा चेहरा आधीच जगासमोर आलेला आहे. त्यामुळे चीनच्या या खुलाशावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. यात एक गोष्ट स्पष्ट आहे की पाकिस्तानला चीनकडून हत्यारे मिळाली होती. याच हत्यारांचा वापर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी केला. भारतीय सैन्यानेही चिनी मिसाईल पाडल्याची माहिती दिली आहे.
पाकिस्तानकडील चिनी हत्यारे
चीनने पाकिस्तानला विविध प्रकारची हत्यारे दिली आहेत. यामध्ये फायटर जेटपासून मिसाईल पर्यंत अनेक प्रकारच्या हत्यारांचा समावेश आहे.
V 4 टॅंक
चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत सन 2018 मध्ये एक करार झाला होता. यानुसार पाकिस्तानने चीनकडून 72,86,17,11,450 रुपयांत 176 व्ही 4 टँक खरेदी केले होते.
SH 15 155mm Howitzers
पाकिस्तान सैन्याने सन 2019 मध्ये SH 15 155mm Howitzers साठी एक मोठी डील केली होती. यानंतर सन 2022 मध्ये 42,39,57,57,900 रुपयांत 236 SH 15 155mm Howitzers सैन्यांत समाविष्ट करण्यात आले.
Video : पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; भारतीय लष्कराची पत्रकार परिषद, पाहा व्हिडिओ
JF 17 Thunder आणि J 10C Firebird लढाऊ विमाने सुद्धा चीनकडून खरेदी करण्यात आली आहेत. यामध्ये 25 J 10C Firebird लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी पाकिस्तानने तब्बल 100 कोटी डॉलर खर्च केले आहेत. तसेच पाकिस्तानने HQ 9 Long Range Air Defence, Chinese UCAVs आणि 278 मिलियन डॉलर मोजून चार Karakoram Eagle (ZDK-03 AWACS) देखील खरेदी केले आहेत.