Video : पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; भारतीय लष्कराची पत्रकार परिषद, पाहा व्हिडिओ

Video : पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात; भारतीय लष्कराची पत्रकार परिषद, पाहा व्हिडिओ

Indian Army Press Conference on Operation Sindoor :  दहशतवाद्यांना उत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. या कारवाईत फक्त दहशतवादी स्थळ उध्द्वस्थ केली. त्यामध्ये एकाही नागरिकाला लक्ष केलं नाही. (Sindoor) सर्व ९ ठिकाणी भारतीय लष्कराने अटॅक केला. ज्या ठिकाणी दहशतवादी स्थळ आहेत. त्यामुळे हा लढा फक्त दहशतवादाविरूद्ध आहे अशी माहिती डीजीएमओ राजीव घई यांनी दिली. ते लष्कराच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. आज रविवार (दि, ११ मे)रोजी सायंकाळी ६:३० वाजता ही पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली.  यावेळी पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचा थेट घणाघात भारतीय लष्कराने केला आहे.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचाच हात असल्याचा थेट आरोप यावेळी भारतीय लष्कराने केला आहे. त्याचबरोबर भारतीय सैन्याने पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला असंही सांगितलं. बहावलपूर आमच्या टारगेटवर होतं. त्यामध्ये लाहोरमधील डिफेन्स स्थळ नष्ट केले असून नऊ ठिकाणी हल्ले करून सुमारे १०० दहशदवाद्यांचा खात्मा केल्याचा दावाही लष्कराने केला आहे.

आता गोळी नाही तर भारताकडून गोळा चालणार; POK टार्गेट अन् मोदींनी ललकारलं

कसाबने प्रशिक्षण घेतलेलं स्थळही उद्ध्वस्त केलं असल्याचा दावा यावेळी करण्यात आला आहे. तसंच, भारताच्या एअर अटॅक सिस्टीमने पाकिस्तानचे सर्व ड्रोन पाडले. यामध्ये मोठ्या कारवाईत तीन मोठे दहशतवादीही मारले गेले. लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम संपवली. या कारवाईत अनेकदा पाकिस्तानने नागरी विमानांचा आधार घेतला असंही यावेळी सांगण्यात आलं आहे.

7 व 8 मे च्या मध्यरात्रीपर्यंत पाकिस्तानकडून हल्ले सुरुच होते. हा संघर्ष सुरू असतानाही पाकिस्तानात प्रवासी विमानं उडत होती. भारतातील लष्करी ठिकाणी पाकिस्तानच्या टार्गेटवर होती. यामध्ये झालेल्या कारवाईत पाकिस्तान लष्करातील 35 ते 40 सैनिकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय हल्ल्यांच्या वेगाने पाकिस्तान चकीत झाला होता असंही यामध्ये म्हटलं आहे.

अमेरिकी परराष्ट्रमंत्र्यांनी असीम मुनीर यांच्याशी केली चर्चा

सूत्रांनुसार, 7 मे रोजी भारताने पाकिस्तानच्या DGMO ला कळवले होते की, त्याने पाकिस्तानातील दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले आहे. परंतु पाकिस्तानकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर 9 मे रोजी भारताने हवाई हल्ले केले आणि 10 मे च्या सकाळी गोळीबार केला. या घटनांनंतर अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केली आणि नंतर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांना फोन करून सांगितले की, पाकिस्तान चर्चेसाठी तयार आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube