Operation Sindoor नंतर पाकिस्तान घाबरला, PSL चे सर्व सामने रद्द होणार?

Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत (Operation Sindoor) पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ला करत बदला घेतला आहे. या कारवाईनंतर पाकिस्तानने (Pakistan) भारतातील तब्बल 15 ठिकाणी हल्ला करण्याचे प्रयत्न केला होता मात्र भारतीय लष्कराने इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला.
तर दुसरीकडे पाकिस्तान आणि भारतात वाढत असणाऱ्या तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग (PSL) अडचणीत आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार पीएसएलचे उर्वरित सर्व सामने रद्द होऊ शकतात किंवा दुसऱ्या देशात शिफ्ट होण्याची शक्यता आहे. काही वेळापूर्वी रावळपिंडी स्टेडियम (Rawalpindi Stadium) जवळ ड्रोनने हल्ला करण्यात आला आहे. यामुळे आज रात्री या स्टेडियममध्ये होणारा पीएसएल सामना रद्द करण्यात आला आहे. तर पीसीबीने पीएसएलचे उर्वरित सामने दुसऱ्या देशात करण्याबाबत विचार करायला सुरुवात केली आहे.
पाकिस्तानी वृत्तवाहिनी जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी यासंदर्भात गृहमंत्रालयाला भेटणार आहेत. बैठकीत ते परिस्थितीचा आढावा घेतील आणि पीएसएलवर त्याचा संभाव्य परिणाम काय होईल यावर चर्चा करतील. समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत पीएसएल सामने पूर्वीसारखेच सुरू राहतील की स्थगित केले जातील याचा निर्णय घेतला जाणार आहे. तसेच पीसीबी सध्या पीएसएलचे उर्वरित सामने दुबई किंवा दोहामध्ये आयोजित करण्याचा विचार करत आहे. सध्या या स्पर्धेचे सर्व उर्वरित सामने कराचीमध्येच आयोजित करण्याचा निर्णय पीसीबीने घेतला आहे.
पंजाबमध्ये BSF ची मोठी कारवाई, पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या
22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारत सरकारकडून पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्यात येत आहे. माहितीनुसार, भारतीय लष्कराने लाहोरमधील पाकिस्तानची डिफेन्स सिस्टीम देखील नष्ट केली आहे