पंजाबमध्ये BSF ची मोठी कारवाई, पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या

पंजाबमध्ये BSF ची मोठी कारवाई, पाकिस्तानी घुसखोराला घातल्या गोळ्या

BSF Action Against Pakistani Intruders : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत आहे. भारताने या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले केले आहे. तर दुसरीकडे आता आणखी एक मोठी बातमीसमोर आली आहे. या बातमीनुसार पंजाबमध्ये बीएसएफने (BSF) मोठी कारवाई करत एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले आहे. याबाबत एएनआयने माहिती दिली आहे.

माहितीनुसार, 7-8 मे च्या मध्यरात्री पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये बीएसएफने एका पाकिस्तानी घुसखोराला ठार मारले आहे. एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने असेही म्हटले आहे की, पाकिस्तानी घुसखोर जाणूनबुजून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना दिसला आणि अंधाराचा फायदा घेत सीमा सुरक्षा कुंपणाकडे जात होता. आधीच सतर्क असलेल्या बीएसएफ जवानांनी त्याच्यावर गोळीबार केला. सकाळी त्याचा मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतातील 17 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता मात्र भारतीय सैन्याने पाकिस्तानचा हा प्रयत्न हाणून पाडला.

मोठी बातमी, पाकिस्तानातील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर ड्रोन हल्ला

पाकिस्तानने 7 आणि 8 मे 2025 च्या रात्री अवंतिपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नाल, फाळोदी, उत्तरलाई आणि भुज यांसारख्या उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी ठिकाणांवर ड्रोन व क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. भारतीय लष्कराने या सर्व हल्ल्यांना भारताच्या इंटिग्रेटेड काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टमने यशस्वीरित्या निष्प्रभ केले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube