ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच! पाकिस्तानमधील 12 नवीन ठिकाणांची यादी तयार…

ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच! पाकिस्तानमधील 12 नवीन ठिकाणांची यादी तयार…

PM Modi Choose 12 Terror Sites Operation Sindoor : भारताचे ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)अजूनही चालूच आहे. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत या कारवाईची माहिती सर्व पक्षांना दिली.ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील (Pakistan) अजून 12 ठिकाणांची यादी तयार केल्याची देखील (India Pakistan War) माहिती मिळतेय.

ऑपरेशन सिंदूरमध्ये 7 मे रोजी नऊ दहशतवादी अड्ड्यांवर हवाई हल्ला करण्यात आला होता. यामध्ये सुमारे 100 दहशतवादी मारले गेले. जर पाकिस्तानने हल्ला केला तर सरकार आणि लष्कर मागे हटणार नाही. राजनाथ सिंह यांनी बैठक घेतल्याचे रिजिजू म्हणाले. हा एक गंभीर विषय होता. सर्वांशी जुळवून घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली. विरोधी पक्षाच्या नेत्यांना सरकारच्या हेतूंबद्दल माहिती देण्यात आली. विरोधकांनी परिपक्वता दाखवली.

इंडिया आघाडी सक्रीय नाही, राहुल गांधींनी आणखी…; पवारांचा विरोधकांना काय सल्ला?

या मुद्द्यावर राजकारणाला स्थान नाही. विरोधकांनी म्हटलंय की, आम्ही सरकारसोबत आहोत. ही कारवाई अजूनही सुरू आहे. त्यामुळे आम्ही सविस्तर माहिती देऊ शकत नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. आता बातमी अशी आहे की, पाकिस्तानमधील आणखी 12 दहशतवादी अड्ड्यांची यादी देखील तयार आहे. पीओकेपासून पाकिस्तानच्या आतपर्यंत दहशतवादाची मुळे उखडून टाकण्यासाठी ऑपरेशन सुरू आहे

भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचं वातावरण आहे. लाहोरमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांनंतर आज सकाळपासूनच गोंधळाचे वातावरण आहे. दरम्यान, ऑपरेशन सिदूरसारख्या आणखी एका ऑपरेशनच्या भीतीने पाकिस्तान पछाडले आहे. भारताने आतापर्यंत फक्त नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये असलेल्या आणखी 12 दहशतवादी तळांना लक्ष्य केले जाऊ शकते.

ऑपरेशन सिंदूर अंतर्गत 100 दहशवाद्यांचा खात्मा; सिंदूर पार्ट- 2 बाकी; राजनाथ सिंह यांचा थेट मेसेज

भारताने स्पष्ट केलंय की, दहशतवादाचे उर्वरित आधार देखील नष्ट केले जातील. भारत यासाठी पूर्णपणे तयार आहे. भारताच्या सीमावर्ती भागात हवाई संरक्षण यंत्रणा सतर्क आहे. पाकिस्तानची दहशत आणि नियंत्रण रेषेवरील गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने काश्मीरच्या 10 जिल्ह्यांमध्ये नियंत्रण केंद्रे स्थापन केली आहेत. भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाच्या संयुक्त कारवाईअंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील ज्या नऊ दहशतवादी तळांवर हवाई हल्ले करण्यात आले, त्यात बहावलपूर, मुरीदके, गुलपूर, भिंबर, चक अमरू, बाग, कोटली, सियालकोट आणि मुझफ्फराबाद यांचा समावेश आहे. बहावलपूरमधील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुदिरके येथील लष्कर-ए-तैयबाचे मुख्यालय लक्ष्य करण्यात आले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube