ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच; 100 दहशवाद्यांचा खात्मा; सिंदूर पार्ट- 2 बाकी : राजनाथ सिंह

  • Written By: Published:
ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरूच; 100 दहशवाद्यांचा खात्मा; सिंदूर पार्ट- 2 बाकी : राजनाथ सिंह

Operation Sindoor is still going on Says Defence Minister Rajnath Singh in all Party Meeting : ऑपरेशन सिंदूर मध्ये १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचा दावा भारत सरकारने केला आहे. सरकारने असेही नमूद केले की, ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) अजूनही सुरू असून, यात ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची संख्या वाढू शकते असे केंद्राने स्पष्ट केले आहे. तसेच सिंदूर पार्ट 2 अद्याप बाकी असल्याचेही केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. ते ऑपरेशन सिंदूरनंतर आयोजित सर्वपक्षीय बैठकीत बोलत होते. ही सर्वपक्षीय बैठक सुमारे दीड तास चालली. विरोधकांनी या कारवाईवर समाधान व्यक्त केले आणि या मुद्द्यावर सरकारसोबत असल्याचे सांगितले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही आणि ते सुरूच आहे.

 

आम्ही सर्वजण सरकारसोबत : खरगे

सर्वपक्षीय बैठकीनंतर काँग्रेस खासदार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “बैठकीत, आम्ही केंद्राचे म्हणणे ऐकले. तसेच आम्ही सर्वजण सरकारसोबत आहोत असाही विश्वास मोदी सरकारला दिल्याचे खरगे यांनी यावेळी सांगितले.सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षांनी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली आहे. या कारवाईनंतरही पाकिस्तान जर शांत बसला नाही तर, भारतही शांत बसणार नसल्याचा थेट संदेश राजनाथ सिंह यांनी दिला आहे.

टीआरएफविरुद्ध मोहीम सुरू करावी : ओवेसी

ऑपरेशन सिंदूरसाठी मी आपल्या सशस्त्र दलांचे आणि सरकारचे कौतुक केले आहे. रेझिस्टन्स फ्रंट (टीआरएफ) विरोधात जागतिक मोहीम सुरू करावी असे मी सुचवल्याचे ओवेसी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “मी असेही सुचवले आहे की, सरकारने अमेरिकेला (टीआरएफ) दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्याची विनंती करावी. पाकिस्तानला आपण एफएटीएफमध्ये ग्रे-लिस्ट करण्यासाठीदेखील प्रयत्न केले पाहिजेत.

ब्रेकिंग : ‘ऑपरेशन सिंदूर’ ला ट्रेडमार्क करण्याचा प्रयत्न! रिलायन्स इंडस्ट्रीजसह अनेकांचा अर्ज

बैठकीला कोण-कोण उपस्थित होते

दिल्लीतील संसदेच्या आवारातील संसद ग्रंथालय इमारतीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. ज्यात केंद्राकडून राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा आणि किरण रिजिजू यांच्याव्यतिरिक्त परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, आरोग्य मंत्री जेपी नड्डा, अर्थमंत्री निर्मला सीतारमण हे बैठकीला उपस्थित होते. तर, विरोधी पक्षाकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, सुप्रिया सुळे आणि संजय राऊत सहभागी झाले होते. याशिवाय प्रफुल्ल पटेल, संबित पात्रा, संजय सिंह संजय झा, प्रेमचंद गुप्ता, जॉन ब्रिटास हेहीदेखील या बैठकीला उपस्थित होते.

Operation Sindoor : हुजूर अब बख्श दीजिए! ऑपरेशन सिंदूरचा दणका बसताच पाकिस्तान वठणीवर

हुजूर अब बख्श दीजिए! ऑपरेशन सिंदूरचा दणका बसताच पाकिस्तान वठणीवर

ऑपेरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर पायाखालची जमीन सरकलेल्या पाकिस्तानकडून (Pakistan) भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना फोन करून हुजूर अब बख्श दीजिए अशा विनवण्या करण्यात येत आहे. पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि आयएसआय प्रमुख असीम मलिक यांच्याकडून या विनवण्या करण्यात आल्या आहेत. असीम मलिक यांनी डोभाल यांच्याकडे आणखी कोणत्या विनंत्या केल्या हे स्पष्ट झालेले नाही.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube