ऑपरेशन सिंदूरनंतर हाय अलर्ट, अंबानी-अदानींचं टेन्शन वाढलं! पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याची भीती

ऑपरेशन सिंदूरनंतर हाय अलर्ट, अंबानी-अदानींचं टेन्शन वाढलं! पाकिस्तानकडून मोठ्या हल्ल्याची भीती

Ambani Adani In Danger From Pakistan : भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर आशियातील दोन मोठे उद्योगपती आणि श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि गौतम अदानी यांचं (Gautam Adani) टेन्शन वाढलं आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर, भारतीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळे भारत सरकारने पाकिस्तान (India Pakistan Tension) सीमेजवळील ऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा कडक केली आहे. यामध्ये गुजरातमधील जामनगर येथे स्थित जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कारखाना आणि कच्छ जिल्ह्यातील खावडा अक्षय ऊर्जा पार्क यांचा समावेश आहे. त्यांच्या सुरक्षेबाबत आधीच हाय अलर्ट (Pakistan) होता, पण आता सुरक्षा उपाययोजना आणखी मजबूत करण्यात आल्या आहेत.

हे दोन्ही मोठे प्रकल्प देशाचे आणि आशियातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांचे आहेत. अशा परिस्थितीत तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांवर एक मोठा धोका निर्माण झाला आहे.

वाहनधारकांसाठी मोठी बातमी! देशभरात मागील 36 तासांपासून पेट्रोल- डिझेल पुरवठा विस्कळीत, कारण काय? जाणून घ्या सविस्तर

अंबानी कसे धोक्यात?

जामनगरमधील रिलायन्स इंडस्ट्रीजची तेल शुद्धीकरण कारखाना ही जगातील सर्वात मोठी तेल शुद्धीकरण कारखाना आहे. याची क्षमता दररोज 14 लाख बॅरल तेल प्रक्रिया करण्याची आहे. हा परिसर नो-फ्लाय झोनमध्ये येतो. जवळच हवाई दलाचा तळ देखील आहे. म्हणूनच येथे सुरक्षेबाबत विशेष दक्षता घेतली जाते.

अदानीला काय धोका

खावडा रिन्यूएबल एनर्जी पार्क हा जगातील सर्वात मोठा सौर ऊर्जा पार्क आहे. याची एकूण क्षमता 45 गिगावॅट आहे. यामध्ये अदानी ग्रीनचा सर्वात मोठा वाटा आहे, तो 30 गिगावॅट क्षमतेचा प्लांट विकसित करत आहे. याशिवाय, एनटीपीसी आणि गुजरात इंडस्ट्रीज पॉवर कंपनी देखील या प्रकल्पात सहभागी आहेत. हे उद्यान भारत-पाक सीमेपासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहे आणि सीमा सुरक्षा दलाद्वारे त्यावर देखरेख केली जाते.

हाय अलर्ट! विजांचा कडकडाट अन् वादळी वारे, ‘या’ जिल्ह्यांना पुढचे 24 तास महत्त्वाचे ; हवामान विभागाचा अंदाज

भारत हाय अलर्टवर

हाय अलर्टचे कारण म्हणजे, हे भाग भारतीय हवाई दलाच्या तीन प्रमुख तळ, जामनगर, नालिया आणि भूज यांच्या 50 किमीच्या परिघात येतात. या ठिकाणी भौतिक सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यासारखे उपाय खूप महत्वाचे आहेत, असा सुरक्षा तज्ञांचा विश्वास आहे. हार्टेक ग्रुपचे सीईओ सिमरप्रीत सिंग म्हणाले की, या ऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी बहुस्तरीय रणनीती असायला हवी. यामध्ये, भौतिक सुरक्षा, पाळत ठेवणे, नियमित सुरक्षा कवायती आणि सायबर सुरक्षेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

देशातील इतर 24 विमानतळांसह जामनगर विमानतळही 9 मे पर्यंत बंद ठेवण्यात आलंय. यामुळे सुरक्षेचा प्रश्न आणखी वाढला आहे. कोणत्याही संभाव्य धोक्याला तोंड देण्यासाठी सरकारने अतिरिक्त सुरक्षा दल तैनात केले आहेत. देखरेख यंत्रणा मजबूत केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube