“..तरीही PM मोदींच्या चेहऱ्यावर तणावाचा लवलेशही नव्हता”, ज्येष्ठ साहित्यिक विक्रम संपत यांची पोस्ट व्हायरल

India Pakistan Crisis : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीचंही कौतुक होत आहे. यातच ज्येष्ठ इंग्रजी साहित्यिक विक्रम संपत यांनी एक हृदयस्पर्शी पोस्ट फेसबूकवर लिहिली आहे. या पोस्टमध्ये संपत यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यशैलीचं त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आहे. खरंच हा माणूस (नरेंद्र मोदी) वेगळ्याच मातीचा बनला आहे असे गौरवोद्गार त्यांनी या पोस्टमध्ये काढले आहेत.
काय आहे विक्रम संपत यांची पोस्ट
इतक्या मोठ्या ऑपरेशन सिंदूरच्या जेमतेम चार ते पाच तास आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी एबीपी नेटवर्कच्या परिषदेमध्ये आम्हा सर्वांना भेटत होते. विनोद करत होते. सहज गप्पा मारत होते. त्यांच्या ओळखीच्या लोकांची आणि त्यांच्या पालकांची वैयक्तिक चौकशी करत होते (अम्मी की तबीयत अब कैसी है? त्यांनी माझ्या शेजारी उभ्या असलेल्या अभिनेता आमिर खानला विचारले). थोडाही तणाव किंवा चिंता यांचा मोदींच्या चेहऱ्यावर लवलेशही नव्हता. हा गुण आत्मसात करण्यासारखा आहे.
पिक्चर अभी बाकी है! अर्धसैनिक दलांच्या सुट्ट्या रद्द; हाय अलर्ट जारी, अमित शाहांचे आदेश काय?
नर्म विनोद, बिनचूक तथ्ये आणि डेटा यांनी समृद्ध अशा त्यांच्या व्याख्यानात, ‘भारताच्या पाण्याचा वापर फक्त एका देशाद्वारे केला जात आहे’, हा एकमेव ओझरता संदर्भ वगळता त्रासदायक शेजाऱ्याचा उल्लेखही मोदींच्या भाषणात नव्हता. त्यांनी जाहीर केले, की काही तासांपूर्वीच त्यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांशी बोलून मुक्त व्यापार करार निश्चित केला आहे. अनेक वर्षांपासून हा करार रखडलेला होता आणि त्याच रात्री उशिरा आम्हाला एक निर्णायक बाब समजणार होती. ती अशी की आपल्या देशाच्या नेतृत्वाने घेतलेल्या पूर्वनियोजित अंतिम निर्णयाच्या अचूक अंमलबजावणीची वाट आपला देश पाहणार आहे. खरंच, हा माणूस वेगळ्याच मातीचा बनलेला आहे.
पीएम मोदींकडून विदेश दौरा रद्द
ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठा निर्णय घेतला आहे. मोदींनी त्यांचा तीन दिवसांचा परदेश दौरा स्थगित केला आहे. पीएम मोदी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड्स या देशांच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, देशातील सध्याची परिस्थिती पाहता त्यांनी या दौऱ्यावर जाणे टाळले आहे. पंतप्रधान मोदी सातत्याने माहिती घेत आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानवर केलेल्या या कारवाईवर त्यांचे बारीक लक्ष होते. त्यांच्या सल्ल्यानुसारच या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर असे नाव देण्यात आले.
‘ऑपरेशन सिंदूर’नं बिथरला पाकिस्तान; भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे ‘हे’ 5 पर्याय