आम्ही बुडालो, तर अर्धे जग सोबत घेवून जावू! अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने भारताला दिली अणुहल्ल्याची धमकी

आम्ही बुडालो, तर अर्धे जग सोबत घेवून जावू! अमेरिकेच्या भूमीतून पाकिस्तानने भारताला दिली अणुहल्ल्याची धमकी

Pakistan Army Chief Asim Munir Nuclear Threat To India : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करी प्रमुख फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीतून भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली (Pakistan Army Chief Asim Munir) आहे. टॅम्पा, फ्लोरिडामध्ये आयोजित एका ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर म्हणाले, आम्ही अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र आहोत. जर आम्हाला वाटले की आम्ही बुडालो (India Pakistan War) आहोत, तर आम्ही अर्ध्या जगाला सोबत घेऊन बुडू. हे विधान अमेरिकेच्या (America) भूमीवरून दिले गेले असल्याने, याचे महत्त्व आणखी वाढले आहे.

भारतावर क्षेपणास्त्र हल्ला करणार

‘भारताच्या धरणावर क्षेपणास्त्र हल्ला करणार’ भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षानंतर दोन महिन्यांत दुसऱ्या अमेरिकन भेटीत मुनीर यांनी सिंधू नदीवरील नियंत्रणावरून भारतावरही निशाणा साधला. ते म्हणाले, आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू. जेव्हा ते बांधेल तेव्हा आम्ही ते दहा क्षेपणास्त्रांनी नष्ट करू. द प्रिंटनुसार, ते पुढे म्हणाले, सिंधू नदी ही कोणत्याही भारतीय कुटुंबाची मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, अलहमदुलिल्लाह.

अमेरिका राष्ट्रपती ट्रम्प यांचा टॅरिफचा निर्णय त्यांच्याच अंगलट; नागरिकांना बसतायेत महागाईच्या झळा

आंतरराष्ट्रीय दहशतवादात भारताचा सहभाग

मुनीर असीम मुनीर यांनी भारताची तुलना ‘महामार्गावर धावणाऱ्या मर्सिडीज’ आणि पाकिस्तानची तुलना ‘गारगोटी आणि दगडांनी भरलेल्या ट्रक’शी केली. भारत महामार्गावर फेरारीसारखे चमकणारी मर्सिडीज आहे, परंतु आम्ही दगडाने भरलेला ट्रक आहोत. जर ट्रक कारला धडकला तर कोणाचे नुकसान होईल? मुनीर यांनी दावा केला की, भारत स्वतःला विश्व गुरु म्हणून सादर करू इच्छितो, परंतु प्रत्यक्षात ते त्यापासून दूर आहे. त्यांनी कॅनडामधील एका शीख नेत्याची हत्या, कतारमध्ये आठ भारतीय नौदल अधिकाऱ्यांची अटक आणि कुलभूषण जाधव प्रकरणाचा संदर्भ देत दावा केला की या घटना आंतरराष्ट्रीय दहशतवादात भारताच्या कथित सहभागाचे ‘पुरावे’ आहेत.

मोठी बातमी! इगतपुरी येथील रेन फॉरेस्ट रिसॉर्टवर ‘CBI’चा छापा; अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचं उघड

मुनीर यांनी लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली मुनीर यांनी अमेरिकेच्या राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांची तसेच पाकिस्तानी प्रवासींचीही भेट घेतली. या दरम्यान, त्यांनी यूएस सेंट्रल कमांड (सेंटकॉम) चे निवृत्त कमांडर जनरल मायकेल कुरिएल यांच्या निवृत्ती समारंभाला आणि अॅडमिरल ब्रॅड कूपर यांच्या पदग्रहण समारंभाला हजेरी लावली.

अमेरिका-पाकिस्तान लष्करी संबंध

मुनीर यांनी कुरिला यांच्या नेतृत्वाची आणि अमेरिका-पाकिस्तान लष्करी संबंधांमधील त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली. त्यांनी लष्करी सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफचे अध्यक्ष जनरल डॅन केन यांचीही भेट घेतली. त्यांना पाकिस्तानला भेट देण्याचे आमंत्रण दिले. गेल्या दोन महिन्यांत मुनीर यांचा हा दुसरा अमेरिका दौरा होता. जूनमध्ये त्यांनी एका खाजगी जेवणाच्या वेळी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये तेल करारासह अनेक सहकार्याच्या घोषणा करण्यात आल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube