अजून काहीतरी मोठं घडणार! BSF च्या महासंचालकांनी घेतली मोदींची भेट, आता बीएसएफ धडा शिकवणार?

अजून काहीतरी मोठं घडणार! BSF च्या महासंचालकांनी घेतली मोदींची भेट, आता बीएसएफ धडा शिकवणार?

Operation Sindoor : पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवत पाकिस्तानचा बदला घेतला. हवाई दलाने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरच्या हद्दीत ‘एअर स्ट्राईक’ (Air Strike) करत ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. दरम्यान, भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. तर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा घडामोडींना वेग आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि बीएसएफचे महासंचालक यांच्यात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक झालीये.

Operation Sindoor: आता पाकला वेदनांची जाणीव झाली असेल, पण कारवाई इथेच…; हिमांशी नरवाल काय म्हणाल्या? 

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठका घेत आहेत. भारताने मध्यरात्री पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर सर्व भारतीय यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. भारताचे हवाई दल, लष्कर आणि नौदल सज्ज आणि सतर्क झालेय. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान चवताळला असून सीमाभागात गोळीबार केला जात आहे. हीच बाब लक्षात घेऊन, भारताच्या बीएसएफचे महासंचालक मोदींना भेटण्यासाठी थेट दिल्लीला पोहोचले आहेत. त्यांच्यात महत्वाची बैठक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या निवासस्थानी बीएसएफचे महासंचालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे एक तास बैठक झाली. ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. म्हणूनच भारताने नियंत्रण रेषेवर अतिरिक्त सुरक्षा तैनात केली. भारतीय सैनिकही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. हीच माहिती बीएसएफच्या महासंचालकांनी मोदींना दिली आहे.

“त्यांच्या म्हणण्याला महत्व नाही”, ऑपरेशन सिंदूरवरील वक्तव्यावर राज ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर 

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरपूर्वी मोदींनी दिल्लीत अनेक महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठका घेतल्या होत्या. त्यात तिन्ही सशस्त्र दलांचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांचा समावेश होता. या बैठकांमध्ये मोदींनी तिन्ही दलांवर पूर्ण विश्वास व्यक्त केला होता. तुम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार राहा. तुमच्या सोईनुसार टार्गेट ठरवा, असंही मोदींनी सेनेला सांगितल होतं.

अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा…
दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहशतवादी नेता मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तान सीमेवरील परिस्थिती वेगाने बदलत आहे. हवाई दलाने केलेल्या अचूक हल्ल्यानंतर, गृह मंत्रालयाने आता एक मोठे पाऊल उचललं. बीएसएफ, सीआरपीएफ, आयटीबीपी, एसएसबी आणि सीआयएसएफसह सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द करण्यात आल्या आहेत. शिवाय, बीएसएफचे महासंचालकांनी मोदींची भेट घेतली. त्यामुळं ऑपरेश सिंदूरनंतर बीएसएफ पाकवर कारवाई करण्रयाचा विचार करतेय का, हे पुढच्या काही काळातच समजू शकणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube