Operation Sindoor: आता पाकला वेदनांची जाणीव झाली असेल, पण कारवाई इथेच…; हिमांशी नरवाल काय म्हणाल्या?

Operation Sindoor: आता पाकला वेदनांची जाणीव झाली असेल, पण कारवाई इथेच…; हिमांशी नरवाल काय म्हणाल्या?

Himanshi Narwal on Operation Sindoor: भारतीय हवाई दलाने मध्यरात्री पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केलंय. यावर आता पहलगाम हल्ल्यात वीरमरण पावलेले लेफ्टनंट विनय नरवाल (Vinay Narwal) यांच्या पत्नी हिमांशी नरवाल (Himanshi Narwal) यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी सैन्याचे आभार मानले. या ऑपरेशन सिंदूरसाठी (Operation Sindoor) मी पंतप्रधान मोदी आणि देशाच्या सैन्याचे आभार मानते, परंतु भारतीय सैन्याची ही कारवाई इथेच थांबू नये, दहशतवाद पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे, असं त्या म्हणाल्या.

“त्यांच्या म्हणण्याला महत्व नाही”, ऑपरेशन सिंदूरवरील वक्तव्यावर राज ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर 

हिमांशी नरवाल म्हणाल्या, माझा नवरा देशात शांतता नांदावी आणि दहशतवाद्यांचा खात्मा व्हावा म्हणून सैन्यात भरती झाला होता.. आता आपले सैन्य आणि मोदी सरकारने दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांना कडक इशारा दिला. पहलगाम मारल्या गेलेल्या २६ जणांच्या कुटुंबियांनी जे दुःख, वेदना भोगल्या त्या वेदना आता पाकिस्तानमधी जनेतलाही कळतील. भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबविल्याबद्दल मी सरकारचे आभार मानते. पण मी सरकारला विनंती करते की, हे इथेच थांबवू नका. दहशतवादाला नेस्तनाबूत करण्याची ही सुरूवात आहे. माझ्यासोबत जो प्रसंग घडलाय, तो कुणाबरोबरही घडायला नको, असं त्या म्हणाल्या.

कर्नल सोफिया कुरेशीची जगभरात चर्चा; जाणून घ्या, कुठेच वाचनात न आलेल्या खास गोष्टी…. 

पहलगाम हल्ल्याची आठवण सांगताना हिमांशी म्हणाल्या, मी हात जोडून दहशतवाद्यांना विनंती केली होती. पण त्यांनी माझी विनंती मान्य केली नाही. माझे लग्न फक्त सहा दिवसांपूर्वी झाले. माझ्या पतीला सोडून द्या, पण त्यांनी दया दाखवली नाही. उलट, एका दहशतवाद्याने म्हटले की, हे मोदींना जाऊन सांग आणि आज मोदीजी आणि भारतीय सैन्याने अतिरेक्यांना चोख प्रत्युत्तर दिलयं.

ऑपरेशन सिंदूर माझ्याशी जोडलं गेलंय
या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर नाव दिल्याबद्दलही हिमांशी यांनी आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या, ऑपरेशन सिंदूर या नावासोबत मी स्वत: जोडले गेले आहे, मी माझा जोडीदार गमावला. कुणालाच कल्पना नाही की, माझ्या मनावर किती मोठा आघात झालेला आहे. अनेक आयांनी आपली मुलं गमावलीत, तर कोणी पती गमावले. त्यामुळं या मोहिमेला ऑपरेशन सिंदूर हे एकदम योग्य नाव आहे. पण, मी आशा करते की, पुन्हा कुणाबरोबर अशा घटना घडू नये, ज्यांनी निष्पाप लोकांना मारले, कुटुंबे उद्ध्वस्त केली त्यांना कठोर शिक्षा झाली आहे, असं हिमांशी म्हणाल्या.

अजहरच्या कुटुंबातील १४ जणांचा खात्मा…
दरम्यान, भारताने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहशतवादी नेता मसूद अजहरच्या कुटुंबातील १४ सदस्यांसह अनेक दहशतवादी मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube