“त्यांच्या म्हणण्याला महत्व नाही”, ऑपरेशन सिंदूरवरील वक्तव्यावर राज ठाकरेंना फडणवीसांचे प्रत्युत्तर

Devendra Fadnavis replies Raj Thackeray : भारताने पाकिस्तानवर हल्ला करत पहलगाम दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ल्याचा बदला घेतला. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंनी मात्र मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. एअर स्ट्राइक, युद्ध काही पर्याय नाही असे राज ठाकरे म्हणाले होते. त्यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, ऑपरेशन सिंदूरसाठी मी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानतो. या घटनेनंतर ते स्पष्टपणे म्हणाले होते की याचं उत्तर दिलं जाईल. यानंतर भारतीय सैन्याने उत्तर दिलं आहे. मुंबईत ज्यांनी हल्ला केला त्या हाफिज सईद आणि डेव्हिडचे अड्डे देखील उद्धवस्त झाले आहेत. हा नवा भारत आहे. कोणत्याही प्रकारे हल्ले सहन करत नाही. हे भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.
ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही.; राज ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे
राज ठाकरे काय म्हणतात याला काही महत्व नाही. संपूर्ण जनता पाठीशी उभी आहे. या कारवाईचं जनतेकडून कौतुक होत आहे. संपूर्ण जग आपल्या पाठीशी उभं आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होते राज ठाकरे
पहलगाम हल्ला झाल्यानंतर ज्यावेळी मी पहिलं ट्विट केलं त्यात सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला त्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिल अशी कारवाई झाली पाहीजे. पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. ज्यावेळी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी काही युद्ध केलं नाही तर ते अतिरेकी ठार मारले होते.
दुसऱ्या देशात युद्ध परिस्थिती आणायची आणि इकडे मॉकड्रील करायचं. पण मुळात ही गोष्ट का घडली यासाठी थोडसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. पाकिस्तान आधीच बर्बाद झालेला देश आहे त्यांना तुम्ही काय बर्बाद करणार? पण प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. ज्या ठिकाणी पर्यटक दरवर्षी हजारोंच्या संख्येने जातात त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मला वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.
Video : अचूक ऑपरेशन अन् हनुमानाचा आदर्श; ऑपरेशन सिंदूरबाबत राजनाथ सिंह काय म्हणाले?