ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही.; राज ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे

ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही.; राज ठाकरेंनी काढले मोदी सरकारचे वाभाडे

Raj Thackeray on Operation Sindoor : पहलगाम येथील दहशतवादी हल्ला पाकिस्तानला चांगलाच महागात (OPeration Sindoor) पडला आहे. भारताने बुधवारी मध्यरात्रीच थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे अड्डे  (India Pakistan Tension) उद्धवस्त केले. फक्त पीओकेच नाही तर थेट पाकिस्तानात 100 किलोमीटर (Pahalgam Terror Attack) आत घुसून हल्ले केले. भारतीय सैन्याच्या या धाडसी ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक होत आहे. राजकीय वर्तुळातूनही सैन्याच्या कारवाईला पाठिंबा मिळत आहे.

पण, यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र या कारवाईचं कौतुक सोडाच मोदी सरकारवर घणाघाती टीका केल्याचं दिसून आलं. देशात आज अनेक प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष करुन मॉकड्रील, एअर स्ट्राइक करुन लोकांना भरकटवून युद्धा हा पर्याय होऊ शकत नाही, असे राज ठाकरे (Raj Thackeray) म्हणाले आहेत.

राज ठाकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना ऑपरेशन सिंदूरबाबत विचारले. राज ठाकरे म्हणाले, पहलगाम हल्ला झाल्यानंतर ज्यावेळी मी पहिलं ट्विट केलं त्यात सांगितलं होतं की ज्यांनी हल्ला केला त्यांना धडा शिकवला पाहिजे. त्यांच्या पुढच्या पिढ्यांना लक्षात राहिल अशी कारवाई झाली पाहीजे. पण दहशतवादी हल्ल्याचं उत्तर युद्ध नसतं. ज्यावेळी अमेरिकेवर दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी त्यांनी काही युद्ध केलं नाही तर ते अतिरेकी ठार मारले होते.

दुसऱ्या देशात युद्ध परिस्थिती आणायची आणि इकडे मॉकड्रील करायचं. पण मुळात ही गोष्ट का घडली यासाठी थोडसं अंतर्मुख होऊन आपण आपला विचार करणं गरजेचं आहे. पाकिस्तान आधीच बर्बाद झालेला देश आहे त्यांना तुम्ही काय बर्बाद करणार? पण प्रश्न असा आहे की ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला ते अतिरेकी अजून सापडलेले नाहीत. ज्या ठिकाणी पर्यटक दरवर्षी हजारोंच्या संख्येने जातात त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? मला वाटतं हे प्रश्न जास्त महत्वाचे आहेत.

कोम्बिंग ऑपरेशन करुन अतिरेकी हुडकून काढा

त्यामुळे आपल्या देशात कोम्बिंग ऑपरेशन करून त्यांना हुडकून काढणं हे जास्त महत्वाचं आहे. एअर स्ट्र्राइक (Air Strike) करुन लोकांना वेगळ्या ठिकाणी भरकटवून युद्ध हा काही पर्याय होऊ शकत नाही असे राज ठाकरे म्हणाले.

मोदींना ‘त्या’ गोष्टी टाळता आल्या असत्या

सरकारच्या ज्या चुका आहेत त्या दाखवल्याच पाहिजेत. ज्यावेळी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी पंतप्रधान सौदी अरेबियात होते. नंतर त्यांनी दौरा अर्धवट सोडला. पुढे ते बिहारमध्ये गेले. पण मला वाटतं त्यांना असं करण्याची गरज नव्हती. नंतर केरळात जाऊन अदानी पोर्टचं उद्घाटन केलं. इतकी जर गंभीर परिस्थिती आहे तर या गोष्टी टाळता आल्या असत्या. त्यानंतर मग मॉकड्रील करायची. एअर स्ट्राइक करायची हे काही या गोष्टींवरचं उत्तर नाही.

ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना हुडकून काढणं त्यांचा बंदोबस्त करणं यासाठी संपूर्ण देशभर मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन्स करा. कुठे कोणत्या गोष्टी सुरू आहेत याची माहिती पोलिसांना असतेच. आज आपल्या देशातील प्रश्न संपत नाहीत आणि आपण युद्धाला सामोरे जातोय हे काही योग्य नाही. ऑपरेशन सिंदूर यांसारखी नावं देऊन काही भावनांचा विषय येत नाही असेही राज ठाकरे म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube