मोठी बातमी, PM मोदी 9 सप्टेंबर रोजी पंजाब दौऱ्यावर, पूरग्रस्त भागासाठी करणार घोषणा?

  • Written By: Published:
PM Modi Punjab Visit

PM Modi Punjab Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी पंजाबचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी पंजाबच्या गुरुदासपूरला भेट देणार आहे. याबाबत पंजाब भाजपने सोशल मीडियावर माहिती दिली आहे. एक्स वर ट्विट करत भाजप पंजाबने म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 9 सप्टेंबर रोजी पंजाबच्या गुरुदासपूरला येत आहेत. ते पूरग्रस्त बंधू-भगिनी आणि शेतकऱ्यांना थेट भेटतील आणि त्यांचे दुःख शेअर करतील आणि पीडितांना मदत करण्यासाठी शक्य ती सर्व पावले उचलतील.

पंजाबमध्ये 46 जणांचा मृत्यू

पंजाबमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात (Gurdaspur) पूर आला आहे. या विनाशकारी पुरामुळे आतापर्यंत पंजाबमध्ये 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे 1.75 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे पुरामुळे नुकसान झाले आहे. सध्या पंजाबमध्ये (PM Modi Punjab Visit) एनडीआरएफ, लष्कर, सीमा सुरक्षा दल, पंजाब पोलिसांकडून मदत आणि बचाव कार्य सुरु असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली आहे.

मुसळधार पाऊस आणि शेजारील राज्य हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे सतलज, बियास आणि रावी यासारख्या नद्यांना पूर आल्यामुळे पंजाबमध्ये परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. ज्यामुळे मदत आणि बचाव कार्याला मोठी अडचण येत आहे.

Lalbaugcha Raja Visarjan 2025 : समुद्रात मोठी भरती, लालबागच्या राजाचे विसर्जन रखडले-

3.87 लाखांहून अधिक नागरिकांना फटका

सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, पुरामुळे पंजाबमध्ये तब्बल 3.87 लाखांहून अधिक नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत 46 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 1 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर दरम्यान 14 जिल्ह्यांमध्ये 43 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 23 जिल्ह्यांमधील एकूण 1,996 गावे पुरामुळे प्रभावित झाली आहेत. अनेक लोक बेपत्ता असल्याची देखील माहिती समोर आली आहे. त्यामुळे पंतप्रधान पंजाबसाठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube