Download App

Hiba Nawab: ‘झनक’ मालिकेत हिबा नवाब दिसणार अनोख्या अंदाजात!

Hiba Nawab TV show: ‘स्टार प्लस’ वाहिनी (Star Plus) नेहमीच आकर्षित राहिलेल्या विषयांना हात घालणारा आशय देण्याकरता आणि नवनवे उपक्रम सुरू करण्याकरता ओळखली जात असते. ‘स्टार प्लस’वर नव्याने दाखल होणारी ‘झनक’ ही एक नवी मालिका लवकरच येणार आहे, जी डोळ्यांत आशा आणि स्वप्ने बाळगणाऱ्या एका युवतीची कहाणी असणार आहे. (Hiba Nawab Looks) परंतु तिच्या आयुष्यात अनपेक्षित प्रसंग येतात. हिबा नवाब (Hiba Nawab) ही अभिनेत्री या मालिकेत ‘झनक’ची (Jhanak TV show) मुख्य भूमिका साकारणार आहे. कृशल आहुजा उर्फ अनिरुद्ध हा मुख्य नायकाच्या भूमिकेत असेल तर चांदनी शर्मा अर्शीची भूमिका साकारणार आहे.


‘झनक’ मालिकेत अशा एका युवतीची कहाणी असणार आहे. जी गरिबीत मोठी होते आणि नृत्यांगना बनण्याची आकांक्षा मनाशी बाळगते. तिच्या आकांक्षा साध्य करण्यासाठी झनक सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा निश्चय करते. परंतु जेव्हा तिच्या कुटुंबावर एकमोठं संकट ओढावते तेव्हा तिच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते. या मालिकेतील झनकच्या आयुष्यात होणार्‍या भावनिक उलथापालथीचे साक्षीदार प्रेक्षकांना होता येणार आहे. ती शून्यातून विश्व कसे निर्माण करते, याची रंजक अशी कथा या मालिकेत उलगडली जाणार आहे. झनक, अनिरुद्ध आणि अर्शी यांच्या नातेसंबंधांचा हृदयस्पर्शी प्रवास आणि दुरावलेल्या नात्यांचा त्यांनी केलेला सामना हे पाहणे रंजक असणार आहे.

‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘झनक’ मालिकेत झनकची भूमिका साकारणाऱ्या हिबा नवाबने तिच्या व्यक्तिरेखेबद्दल अधिक माहिती दिली. म्हणाली की, “मी ‘झनक’ मालिकेचा भाग होण्यास अतिशय उत्सुक आहे आणि या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे. माझ्यासाठी हे सारे थरारक आहे. ‘झनक’ काश्मीरची आहे, तिला नृत्यांगना बनायचे आहे आणि तिचे कुटुंबावर अतिशय प्रेम आहे. स्वत:चे नशीब बदलणे आणि मनाची इच्छा पूर्ण करणे हे झनकचे ध्येय असणार आहे.

Praveen Tarde: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेची खास पोस्ट; म्हणाला, ‘तुझ्या ब्रम्हानंदी…’

मी झनकच्या व्यक्तिरेखेशी- विशेषत: तिचे तिच्या आईसोबत असलेल्या नात्याशी व्यक्तिरेखा सादर करणार आहे. मालिकेत दिसणारी मी आणि प्रत्यक्षातील मी सारखीच आहे. झनकची व्यक्तिरेखा साकारताना मला अनेक गोष्टी शिकायला मिळतील आणि मी त्याची वाट पाहात आहे. लीना गंगोपाध्याय निर्मित ‘झनक’ मालिका २० नोव्हेंबरपासून सोमवार ते रविवार रात्री १०.३० वाजता ‘स्टार प्लस’वर प्रसारित करण्यात येणार आहे.

Tags

follow us