Praveen Tarde: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेची खास पोस्ट; म्हणाला, ‘तुझ्या ब्रम्हानंदी…’

Praveen Tarde: पत्नीच्या वाढदिवसानिमित्त प्रवीण तरडेची खास पोस्ट; म्हणाला, ‘तुझ्या ब्रम्हानंदी…’

Snehal Tarde Happy Birthday: दिग्दर्शक-अभिनेते प्रवीण तरडे (Praveen Tarde) सध्या त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहेत. ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘मुळशी पॅटर्न’ यांसारखे त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडले. (Snehal Tarde Birthday) मराठी सिनेसृष्टीतल रांगडा गडी म्हणजे लेखक, दिग्दर्शक, अभिनेता प्रवीण तरडे (Pravin Tarde). एका मागोमाग हिट चित्रपट देणारे प्रवीण तरडे हे नाव आज इंडस्ट्रीमध्ये मोठ्या आदराने घेतलं जातं. आज प्रवीण तरडेच्या पत्नी स्नेहल तरडेच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी खास पोस्ट लिहिली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे.


‘आयुष्यभर तुझ्यासोबत बसून असा चहा पिता यावा.. या एका क्षणासाठी कुठली कठोर तपश्चर्या करावी लागली तरी सांग मी करायला तयार आहे.. जगातील सर्वात महाग एनर्जी ड्रींक कुठलं तर फक्तं तुझ्या हातचा चहाच.. माझा अख्खा दिवस समृध्दं करणारी सुरवात त्या चिमूटभर साखरेत कपभर पाण्यात एक कप चहापत्ती आणि आल्याच्या दोन तुकड्यात नाही तर तो चहा करताना लागणाऱ्या तुझ्या ब्रम्हानंदी समाधीत आहे.. त्यामुळे आज तुझा वाढदिवस असला तरी दोन कप चहा टाक ना गं बायकोडा…. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बायकोडा.

आजवर त्यांच्या प्रत्येक सिनेमातून त्यांनी समाजाला संदेश देण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दर्जेदार कलाकृतींसाठी ते नेहमीच चर्चेत असल्याचे बघायला मिळत असते. प्रवीण यांच्याप्रमाणे त्यांची पत्नी स्नेहल तरडे देखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्नेहल मनोरंजनविश्वासह सोशल मीडियावर (social media) देखील कायम सक्रीय आहे. त्यामुळे कायम त्या नवीन पोस्ट शेअर करत असतात. आज पत्नीच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट केल्याचे बघायला मिळाले आहे. जो सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आला आहे.

Juhi Chawla birthday : …म्हणून सनी देओलच्या ‘या’ चित्रपटात मरता-मरता वाचली होती जुही चावला

अभिनेत्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये पायऱ्यांवरुन बसून चांगल्या जोरदार गप्पा मारत चहा घेत असल्याचे दिसत आहेत. हा पोस्ट शेअर करत प्रवीणने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, ”वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बायकोडा! धकाधकीच्या जीवनात, कामाच्या धबडग्यात प्रेमाचे असे गोड, निवांत क्षण तुला आयुष्यभर लाभोत या शुभ कामना!” आयुष्यभर तुझ्यासोबत बसून असा चहा पिता यावा.. या एका क्षणासाठी कुठली कठोर तपश्चर्या करावी लागली तरी सांग मी करायला तयार आहे.. जगातील सर्वात महाग एनर्जी ड्रींक कुठलं तर फक्तं तुझ्या हातचा चहाच… प्रवीण तरडे यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube