कुटुंबासोबत घरबसल्या अनुभवता येणार गोव्याची धमाल! ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर!

कमाल ट्विस्ट्सने रंगलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर दाखल झाला आहे.

  • Vishal Aarde
  • Written By: Published:
Untitled Design   2026 11 15T151238.868

‘Mamachya Govyala Jauya’ is now on Amazon Prime Video : गोव्याची ट्रिप, मित्रांची धमाल आणि कमाल ट्विस्ट्सने रंगलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर दाखल झाला आहे. हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर उपलब्ध असून संत्या, बाबा, कुश्या आणि त्यांचा लाडका मामा यांच्या गोव्याच्या सफरीचा आनंद आता प्रेक्षकांना घरबसल्या, संपूर्ण कुटुंबासोबत घेता येणार आहे. हलक्याफुलक्या विनोदातून सुरू होणारा हा प्रवास पुढे सस्पेन्स, अॅक्शन आणि अनपेक्षित वळणांनी रंगत जातो. त्यामुळे मनोरंजनाची ही धमाल संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून अनुभवता येणार आहे.

अंकुश चौधरी, कुशल बद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांच्या धमाल केमिस्ट्रीसह नेहा खान, रुचिरा जाधव आणि विदुला चौगुले यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका चित्रपटात आहेत. याशिवाय महेश मांजरेकर, संजय जाधव, सचिन गोस्वामी, मकरंद अनासपुरे, मकरंद देशपांडे, अवधूत गुप्ते आणि प्रवीण तरडे यांसारखे दिग्गज कलाकारही विशेष भूमिकांमध्ये पाहायला मिळतात.

महाराष्ट्रात थंडीचा अलर्ट! पहाटे धुक्याची चादर, रात्री गारठा वाढणार, हवामान विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन

चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते विजू माने म्हणतात, “चित्रपटगृहांमध्ये ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ला प्रेक्षकांकडून मिळालेला प्रतिसाद खूप आनंद देणारा होता. प्रेक्षकांनी चित्रपटातील कलाकारांच्या केमिस्ट्रीला, विनोदाला आणि एकूणच मनोरंजनाला भरभरून दाद दिली. आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या माध्यमातून हा चित्रपट अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. ज्यांनी चित्रपटगृहात हा चित्रपट पाहिला, त्यांना पुन्हा एकदा त्याचा आनंद घेता येईल. तसेच संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून हा चित्रपट पाहावा आणि या गोवा ट्रिपचा आनंद घ्यावा, अशी माझी इच्छा आहे. ओटीटीवरही प्रेक्षकांचे असेच प्रेम मिळेल, अशी अपेक्षा आहे.”

‘विजुमेनिया प्रा. लि.’ आणि ‘लाईट अँड शेड’ प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती विजू माने यांनी केली असून पटकथा आणि संवाद विजू माने, राहुल आवटे आणि कुशल बद्रिके यांचे आहेत. ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ आता अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

follow us