Juhi Chawla birthday : …म्हणून सनी देओलच्या ‘या’ चित्रपटात मरता-मरता वाचली होती जुही चावला
Juhi Chawla birthday : अभिनेत्री जुही चावलाचा आज वाढदिवस (Juhi Chawla birthday) आहे. त्यानिमित्त जुही चावला आणि सनी देओल यांच्या एका चित्रपटाच्या वेळी झालेला किस्सा जाणून घेणार आहोत. काय आहे हा किस्सा जाणून घेऊ ज्यामुळे जुही चावला मरता-मरता वाचली होती.
World Cup 2023 : मार्श-स्मिथची तुफान खेळी! ऑस्ट्रेलियाचा बांग्लादेशवर मोठ्ठा विजय
हे झालं असं होतं की, जुही चावला आणि सनी देओल यांच्या प्रसिद्ध ‘अर्जुन पंडीत’ या चित्रपटाच्या वेळी 1999 मध्ये एक घटना घडली होती. या चित्रपटात या दोघांनी देखील दमदार भूमिका साकरल्या होत्या. मात्र त्यावेळी एका सीनच्या शूटींगच्या वेळी जुहीची मान कापता-कापता वाचली होती. या सीनमध्ये जुही गुंडांपासून वाचण्यासाठी ट्रेंचच्या खाली लपली होती. त्यावरून रेल्वे गेली होती. त्यात जुहीची मान कापता-कापता वाचली होती.
Uddhav Thackeray : ‘हिंमत असेल तर पोलीस बाजूला ठेऊन आम्हाला भिडा’; उद्धव ठाकरेंचं शिंदेंना आव्हान
दरम्यान हा चित्रपट अगोदर अजय देवगणला ऑफर झाला होता. मात्र त्याने नकार दिल्यानंतर हा चित्रपट सनी देओलला मिळाला. त्यामध्ये सनीने अर्जुन पंडित ही भूमिका अत्यंत दमदारपणे निभावली. तर जुहीने त्याच्या अभिनेत्रीची भूमिका निभावली होती. याच चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या सीनच्या शूटींगच्या वेळी जुहीची मान कापता-कापता वाचली होती. या सीनमध्ये जुही गुंडांपासून वाचण्यासाठी ट्रेंचच्या खाली लपली होती. त्यावरून रेल्वे गेली होती.
या अपघाताबद्दल सांगताना जुही म्हणाली होती की, मला महित देखील नव्हतं की, ज्या ट्रेंचखाली मी लपले होते त्यावरून ट्रेमन जाणार होती. त्यात मी थोडी जरी चुकले असते. तर माझी मान कपली गेली असती. पण नशीब चांगलं होतं. म्हणून मी त्यातून वाचले. तर हा जुहीचा पहिला असा चित्रपट होता ज्यामध्ये रोमॅंटीक नाही तर नकारात्मक भूमिकेत दिसली होती. तर सनी देओलच्या अभिनयाचं देखील भरपूर कौतुक झालं होतं.